शिरोळात जागतिक टपाल दिनानिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार

Spread the love

शिरोळ मध्ये जागतिक टपाल दिनानिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार

शिरोळ / प्रतिनिधी

 

विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आगरभाग शिरोळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर , साप्ताहिक वार्तासुख,राधा महिला सोशल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक टपाल दिनाचे “औचित्य साधून टपाल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा पेन , सन्मान चिन्ह व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी शिरोळ पोस्ट खात्यातील अधिकारी सौ. दीपिका शिदनाळे , क्लार्क सुनिल कुमार , रोशन काईंगडे , पोस्टमन संदीप पाटील , सौ. कांबळे मॅडम , परशुराम कांबळे , सुरेश तुर्के , मास्तर व्ही.एन. पोतदार , जे डी. पॅकर्स , बी.जी. ढवळे , पोस्टमन एन.डी. मुल्ला , यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.विजयसिंह पाटील शिक्षक प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव प्रा. मेजर के. एम् भोसले , पत्रकार दत्तात्रय खडके , महेश कुंभार , राधा महिला सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. जयश्री पाटील , परशुराम चव्हाण , तसेच न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगरचे नितीन बागुल , सर्जेराव पोवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते
यावेळी स्वागत व प्रास्ताविक परशुराम चव्हाण यांनी केले . प्रा. मेजर के.एम भोसले सर यांनी आपल्या मनोगतातून जगभरातील देशात टपालाची मुक्त , मोकळी ये – जा व्हावी हे पोस्टल युनियनचे उद्दिष्ट आहे . असे प्रतिपादन केले . सौ. दीपिका शिदनाळे यांनी शिरोळ पोस्टाच्या कार्याची माहिती करून दिली तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन खाते काढून देवू असेही आश्वासित केले

error: Content is protected !!