कृषी उद्योजिका सौ कल्पना माळी रोटरी व्होकेशनल सर्व्हिस ॲवार्डने सन्मानित

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

येथील कृषी उद्योजिका सौ.कल्पना प्रवीण माळी यांनी कृषी व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ यांच्यावतीने रोटरी व्होकेशनल सर्व्हिस ॲवार्डने सन्मानित करण्यात आले.सौ.कल्पना माळी यांनी महिला कृषी उद्योजिका म्हणून गेली ६ वर्षे शेती विषयक लागणारी उत्पादने तयार करणे व विक्री करणे या विषयी कार्ये करीत आहेत.ओयासिस ॲग्रो इंडस्ट्रिज या नावाने सुरू असलेल्या कंपनीतून माती परीक्षण प्रयोगशाळा, जीवाणू खते तयार करणे,विदेशी भाजीपाला करार शेती, मित्र किडींचे उत्पादन प्रयोगशाळा,जैविक किटनाशके तयार करणे, प्रशिक्षण संस्था चालविणे इत्यादी सुविधा त्या शेतकऱ्यांना पुरवतात महाराष्ट्र,कर्नाटक व गोवा राज्यातील शेतकऱ्यांना याचा विशेष लाभ होत आहे. आहे.तसेच जैविक व विषमुक्त शेतीचा प्रचार व प्रसार करण्याचे काम त्या करीत असतात.यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक नंदनवन फुलत आहे.कृषी क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातील त्यांचे योगदान अतुलनीय व प्रशंसनीय असून त्याबद्दल रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी,शिरोळ यांच्यावतीने रोटरी व्होकेशनल सर्व्हिस ॲवार्ड देवून गौरविण्यात आले.
रोटरी क्लबचे डिस्ट्रिक लिटरसी प्रमोशनचे सेक्रेटरी रोटे प्रा.डॉ.प्रशांत कांबळे यांच्या हस्ते तर युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली असिस्टंट गव्हर्नर रोटे विद्यासागर आडगाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सौ कल्पना माळी यांना मानपत्र सन्मानचिन्ह शाल फेटा व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष तुकाराम पाटील (भैय्या), सेक्रेटरी मेजर प्रा.के.एम.भोसले, खजिनदार तथा पत्रकार चंद्रकांत भाट, इव्हेंट चेअरमन संजय रामचंद्र शिंदे,संस्थापक अध्यक्ष संजय पाटील, माजी अध्यक्ष डॉ.अरविंद माने,संजय तुकाराम शिंदे, सदस्य डॉ.उमेश कळेकर,सुरेश देशमुख,उल्हास पाटील, श्रीकांत जाधव,विक्रमसिंह भोसले,अमित जाधव, रणजीतसिंह जगदाळे,सचिन सावंत,आप्पालाल चिकोडे, भरत गावडे यांच्यासह माजी नगरसेवक एन.वाय.जाधव, पत्रकार डी.आर.पाटील,बाळासाहेब कांबळे,दिलीप शिरढोणे,उद्योगपती सचिन माळी,प्रवीण माळी,सुभाष माळी,चंद्रकांत माळी यांच्यासह माळी कुटुंबीय त्यांचे नातेवाईक शिरोळ परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.सौ.कल्पना माळी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!