राजं ग्रुप आणि ग्रामदैवत श्रीखणाई देवी सेवा फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद – लाड

Spread the love

पुलाची शिरोली / कुबेर हंकारे

सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी ग्रामदैवत श्री खणाईदेवी सेवा फाउंडेशन अंतर्गत नागाव गावांमधील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान सोहळा पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष माननीय श्री.एस. डी.लाड सर होते. तत्पूर्वी राजं ग्रुप, नागांव यांच्यातर्फे आयोजित नागांव महा होम मिनिस्टर….. खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा या कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी विविध स्पर्धा अत्यंत उत्साहाने पार पडल्या. महिलांचा सहभाग अगदी वाखणण्याजोगा होता. सुप्रसिद्ध निवेदक श्री.अमृत चव्हाण यांनी अगदी निखळ मनोरंजन तर केलेच पण आबालवृद्धांना देखील खळखळून हसवले. गाण्याच्या तालावर थिरकत महिलांनी अनेक मनोरंजनात्मक खेळांचा आस्वाद घेतला.
यानंतर सायं. 4.00 वा. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. शैक्षणिक क्षेत्रामधील महाराष्ट्र राज्य शासन सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माननीय डॉ.दीपक शेटे तसेच आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल प्रशिक्षक माननीय श्री संदीप लंबे यांचा सन्मान मानपत्र देऊन करण्यात आला. नागाव मधील एस.एस.सी. परीक्षेमध्ये उत्कृष्ट संपादन केल्याबद्दल अथर्व बोरचाटे,अथर्व पाटील,श्रावणी पुजारी, वैष्णवी खाडे यांना गौरविण्यात आले. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे श्री काडसिद्धेश्वर भजनी मंडळ,श्री विठू माऊली भजनी मंडळ नागाव यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
श्री एस.डी.लाड सरांनी आपल्या मनोगतातून राजं ग्रुप आणि फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचे कौतुक केले. सूर्यासारखं तेजस्वी होता येत नसेल तर पणती बनून एखाद्याचा मार्ग दाखवा. राजं ग्रुप आणि श्री खणाई देवी सेवा फाउंडेशन यांनी परंपरा जपत यासारखे कार्य अखंडितपणे चालू ठेवावे. गुणी लोकच गुणांचे कौतुक करतात,यासारखे गौरवोदगार त्यांनी व्यक्त केले. डॉक्टर दीपक शेटे आणि श्री संदीप लंबे यांनी फाउंडेशनच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापक श्री भोसले सर यांनी केले.अपडेट मानाची पैठणी विजेते सौ. दिपाली धनाजी पाटील, सौ.स्नेहल अक्षय सावंत, सौ.वर्षा दीपक वडार यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ.अश्विनी पाटील, सौ.ज्योती माळी, सौ.संजना लंबे, ग्रामदैवत श्री खणाई देवी सेवा फाऊंडेशनचे श्री. अमोल कुंभार, श्री.अतुल सुतार,श्री.अनिरुद्ध शिंगे, अक्षय शिंगे,राजं ग्रुपचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कुमार कुंभार, ओंकार बिरांजे,निखिल हराळे, प्रशांत कुंभार, दीपक वडार, जीवन भोसले, सुशांत कुंभार, सिद्धेश बिरंजे,अभिनंदन कुंभार, प्रसाद पाटील, संकेत सावंत,चंदर यादव उपस्थित होते.
कार्यक्रमास सर्व ग्रामस्थ,भजनी मंडळ, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!