आमदार राजू बाबा आवळे यांनी फुंकले विधानसभा प्रचाराचे रणशिंग

Spread the love

जोतिबा डोंगरावर गुलाल उधळून आमदार राजू बाबा आवळे यांनी फुंकले विधानसभा प्रचाराचे रणशिंग

कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे

दख्खनचा राजा जोतिबाचं येथे हाजारो सहकाऱ्यासोबत जाऊन मनोभावे दर्शन घेत हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू बाबा आवळे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.गेल्यावेळी देखील जोतिबाचे आशिर्वाद घेवून विजयी अभियान सुरू केले होते. यावेळी सोबत आलेले असंख्य सहकाऱ्यांनी केलेल्या चांगभलं च्या जयघोषानं परिसर दणाणून गेला होता.नवरात्री उत्सवानिमित्त मंदिर परिसरातील उत्साहाने मन प्रसन्न झालं.राज्यात जनतेच्या हक्काचं, शेतकऱ्यांच्या सन्मानाचं, महिलेच्या सुरक्षेचं, तरूणाच्या भविष्याचं महाविकास आघाडीचं सरकार येवू दे असं जोतिबाच्या चरणी साकडे घातलं.जोतिबाच्या आशिर्वादाने, जनतेच्या पाठिंब्याने मतदारसंघाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी पुन्हा एकदा विजयाचा एल्गार करू असा संकल्प यावेळी कार्यकर्त्यांनी केला. त्यासाठी आपल्या सर्वांची साथ मिळेल हा विश्वास हि व्यक्त केला.

error: Content is protected !!