शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळची सुकन्या कु.प्रज्ञा श्रीकांत माळकर हिने १o८ वर्षांची परंपरा लाभलेल्या सांगली येथील महात्मा गांधी ग्रंथालयाच्या गोवतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. महात्मा गांधी जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत विविध ठिकाणच्या बहुसंख्य स्पर्धकांनी भाग घेतला होता.या स्पर्धेत कु.प्रज्ञा हिने ” वाचन संस्कृती पुढील आव्हाने “या विषयावर अत्यंत प्रभावीपणे आपले विचार मांडले. सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेत विजय मिळवत प्रज्ञाने हॅट्रिक साधली आहे.प्रज्ञाला भारतीय सैन्यदलातील माजी कॅप्टन श्रीकांत वालवडकर व गणपतराव आरवाडे शिक्षण समूहाच्या अध्यक्षा मेघना कोरे यांच्या हस्ते रोख पारितोषिक, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभास डॉ.अशोक मेहता,डॉ. लताताई देशपांडे,उद्योजक शरद पाटील, शरद शहा,पत्रकार चिंतामणी सहस्त्रबुद्धे,दिगंबर सूर्यवंशी आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री व उपमुख्यमंत्री स्व.आर.आर (आबा ) पाटील यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनात ही स्पर्धा सलग ५ वर्षे जिंकली होती. तर कु. प्रज्ञा माळकर हिने २०२२, २०२३, व २०२४ अशी सलग तीन वर्षे ही स्पर्धा जिंकली आहे. तिने आर. आर. ( आबा ) पाटील यांच्या विक्रमाची बरोबरी करावी अशी अपेक्षा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.या यशाबद्दल सर्व स्तरातून कु. प्रज्ञा माळकर हिचे कौतुक होत असून तिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल सुगते , सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.उर्मिला क्षिरसागर व सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.