शिरोळ / प्रतिनिधी
कुमार विद्यामंदिर घालवाड शाळेत संगणक प्रिंटर उद्घाटन व देणगीदारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी शिक्षण विभाग पंचायत समिती शिरोळचे शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत प्रिंटरचे देणगीदार नाथाजी नाईक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शिवाजी थोरवत,व्हाईस चेअरमन ताजुद्दीन शेख संचालक सागर जाधव संजय साळुंखे प्राचार्य बी.एस कनप,रत्नागिरीतील वनरक्षक संजय रणधीर,घालवाड गावचे माजी उपसरपंच देवातात्या इंगळे,उपसरपंच अभिलाष कांबळे,पोलीस पाटील सौ.सावित्री तोडकर,भारत सोसायटीचे चेअरमन भगवान खोंद्रे,व्हाईस चेअरमन मारुती तिटवे,सामाजिक कार्यकर्ते जयराम बाबर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद खाडे,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रिंटरचे उद्घाटन करण्यात आले.देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.मुख्याध्यापक शरद सुतार यांनी प्रास्ताविक केले. शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.लक्ष्मीकांत हंकारे श्री. बैरागदार,श्री.माकणे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुनील सिरसाठ यांनी केले.आभार प्रदर्शन बंडू राऊत यांनी केले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.