‘पैसे दे नाहीतर कापून टाकीन’ दिली धमकी

Spread the love
सांगली येथील इंदिरानगर परिसरात गळ्याला चाकू लावून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विश्रामबाग पोलिसांनी २४ तासात जेरबंद केले. पृथ्वी रवी लोंढे (वय १८) असे गुन्हेगाराचे नाव आहे.त्याच्यावर पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इंदिरानगर येथील संतोष मार्तंड काळे (वय ४५) हे खासगी नोकरी करतात.३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता ते कन्नड गल्लीतील दुकानात नातवाला खाऊ आणण्यासाठी गेले होते.यावेळी पृथ्वी याने त्यांच्या कॉलरला पकडून मागे ओढले. हातातील वीट त्यांच्या डोक्यात घातली. तसेच त्यांच्या गळ्याला चाकू लावत ‘पैसे दे नाहीतर कापून टाकीन’, अशी धमकी दिली.त्यांच्या खिशातील बाराशे रुपयेही काढून घेतले.काळे यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दाखल केली.या लूटमारीची गंभीर दखल घेत विश्रामबाग ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने संशयिताचा शोध सुरू केला.तो इंदिरानगर येथील घरी आल्याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेतले.त्याने जबरी चोरीची कबुली दिली.पृथ्वी ऊर्फ बन्या हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.त्याच्यावर खुनाचा गुन्हाही दाखल होता.ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रवीण कांबळे, सहायक निरीक्षक चेतन माने,उपनिरीक्षक प्रवीण कांचन,हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे,अमर मोहिते,संदीप साळुंखे,महंमद मुलाणी,
आर्यन देशिंगकर,प्रशांत माळी यांनी केली.
error: Content is protected !!