छ.शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा स्वागताकरिता जयसिंगपूर नगरी सज्ज
जयसिंगपूर येथे बसविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आज सोमवारी दुपारी जयसिंगपुर शहरात आगमन होणार आहे.या निमित्ताने जयसिंगपूर नगरी सज्ज झाली असून छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पुतळ्याचे जंगी स्वागत करण्याचे नियोजन शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी केले आहे.जयसिंगपूर शहराला गेल्या ५० वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिक्षा लागून राहीली होती.अखेर आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आगमन होणार आहे. सोमवारी दुपारी २ वाजता येथील नांदणी नाक्यावर अश्वारूढ पुतळा येणार आहे.त्यानंतर नांदणी नाका ते क्रांती चौकपर्यत भव्य आगमन मिरवणुक होणार आहे.येथील क्रांती चौकात पुतळा आल्यानंतर क्रांती चौक ते शिवतीर्थ स्थळपर्यत अशा २५०० फुट फटाके माळ व अतिशबाजी करण्यात येणार आहे.या आगमन मिरवणुक सोहळ्यात फुलाच्या माळा,लायलिंग,लेझीम, भगवा झेंडे,दाणपट्टा,झाजपथक,दोन चित्ररथ,हालगी, ढोल यासह वाद्याच्या गजरात या मिरवणुक सोहळ्याचे
आयोजन करण्यात आले आहे.शहरातील मराठा बांधव व शिवभक्त पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेवून या आगमन मिरवणुक सोहळ्याचे नियोजन केले होते. त्याचबरोबर गेल्या दोन दिवसापासून शहरातील नांदणी रोडवर विद्युत तारा,वाढलेली झाडे काढण्यात आली होती.तर शहरातील प्रमुख मार्गावर विद्युत रोषणाई व सुशोभिकरण करण्यात आले आहे.तसेच शिवतीर्थ स्थळावर शिल्लक असलेली कामे गतीने पुर्ण करण्यात येणार आहेत.तसेच जयसिंगपूर पोलिसांनी वाहतुक व्यवस्था व बंदोबस्तांचे नियोजन केले आहे. तसेच

जयसिंगपूर नगरपालिका व शिवभक्त यांच्याकडून नियोजन करण्यात येत आहे.