शिरोळ विधानसभा उमेदवारी मिळविण्यात जोरदार रस्सीखेच
कोल्हापूर जिल्हात सर्वात जास्त दरडोई उत्पन्न असलेला तालुका म्हणून शिरोळ तालुका ओळखला जातो.पण अलिकडच्या काही वर्षात सर्वांत जास्त कर्करोगाचे रुग्ण असणारा तालुका म्हणून नवी ओळख निर्माण होत आहे.उगवत्या सूर्याचा तालुका म्हणून ओळखणाऱ्या शिरोळ तालुक्यातून संपूर्ण जिल्हयाला नवी दिशा देण्यात कायमच अग्रेसर असतो.वारणा,कृष्णा, पंचगंगा व दूधगंगा या जीवनवाहिनी ठरणाऱ्या नद्यांच्यामुळे सुजलाम सुफलाम ठरलेला तालुका मात्र कर्नाटकातील आलमट्टी धरण झाल्यापासून दरवर्षी सातत्याने येणाऱ्या महापुराने संपूर्ण आर्थिक कणा बिघडला.सर्वसामान्यांचे जीवन उध्वस्त होत आहे.नेहमीचेच पावसाळ्यातील दोन-तीन महिन्यांच्या रडगाण्याकडे फारसे लक्ष दिले जाते. यावर्षी अकिवाट दुर्घटनेतील ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होवून निष्पाप कर्तृत्ववान गाव कारभाऱ्यांना गमवावे लागले.दत्तप्रभूंच्या पदस्पर्शाने पावनभूमी झालेल्या शिरोळ तालुक्यातील ५२ गावे,जयसिंगपूर,कुरुंदवाड व शिरोळ अशा ३ नगरपालिका क्षेत्रांचा समावेश शिरोळ विधानसभा क्षेत्रात होतो. २०११ च्या जनगणनेनुसार तालुक्यात १,५६,६९३ पुरुष मतदार व १,५६,०९९ स्त्री मतदार अशी एकूण ३,१२,८९२ अशी एकूण मतदारांची संख्या आहे.शिरोळ तालुक्यात देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार, दिनबंधू दलितमित्र दिनकररावजी यादव, सरोजनीताई खंजिरे,सहकारमहर्षी डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील,शेतक-यांचे लढवय्ये नेते राजू शेट्टी, उल्हास पाटील यांनी विधानसभेत शिरोळ तालुक्याचे प्रतिनिधीत्व केले आहे.तर महायुतीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी आणणारे डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर हे विद्यमान आमदार आहेत.शिरोळचा बालेकिल्ला एकाच पक्षाचा किंवा नेत्याचा राहिला नाही.येथील मतदार सूज्ञ आहेत. वैयक्तिक कर्तबगारी, नेतृत्वक्षमता व सर्वसामान्यांच्या सोबत असणारी नाळ याला महत्व देते.पण अलिकडच्या काळात जात फॅक्टरचा प्रभाव पडत असल्याचे दिसून येत असल्याची चर्चा आहे.मराठा, लिंगायत,धनगर,जैन,दलित, मुस्लिम, कोळी महादेव,सुतार,सोनार,लोहार,तेली,कुंभार,वडर, माळी अशा अनेक जाती-धर्माचे मतदार आहेत.सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे.मात्र उमेदवारी जाहीर झाल्यावरच खऱ्या अर्थाने दिशा प्राप्त होणार आहे.उमेदवारी जाहीर झाल्यावर विधानसभेच्या रणांगणाचे चित्र स्पष्ट होणार आहे. दिग्गजांची मांदियाळी उमेदवारी मिळविण्यासाठी लागली असल्याचे चित्र दिसून येत आहे.महायुती – महाविकास आघाडी- स्वाभीमानी शेतकरी संघटना अशी मुख्य लढत होणार असून ऐनवेळी एखादा तगडा अपक्ष उमेदवारही विधानसभेच्या मैदानात उतरु शकतो. विकासकामांच्याबरोबर मनोज जरांगे यांचे उपोषण, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, कोळी महादेव जमातीच्या दाखल्यांचा प्रश्न,अतिक्रमणधारकांचे नियमितीकरण,बेरोजगारी अशा ज्वलंत प्रश्नांचा परिणाम होवू शकतो.महायुतीकडून किंवा अपक्ष या दोन्ही बाजूने विद्यमान आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांची उमेदवारी निश्चित आहे.कोट्यवधी रुपयांच्या विकास कामावर पुन्हा एकदा नशीब आजमावतील.विविध जातीधर्माच्यासाठी दिलेल्या निधीमुळे जातीयतेचा शिक्का पुसून काढण्यात आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यशस्वी झाल्याची चर्चा जोरात आहे.याचा फायदा निवडणुकीत निश्चितपणे होईल.मिळविण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते आग्रही असून गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडीचे चेअरमन माधवराव घाटगे यांना मैदानात उतरविण्याची तयारी सुरु आहे.पण सामाजिक महायुतीची उमेदवारी बांधिलकी व व्यवसायिकतेला प्राधान्य देणारे माधवराव कोणता निर्णय घेतात यावर बरेचसे अवलंबून आहे.केंद्रीय फर्टीलायझर व रसायन मंडळाचे संचालक व मयूर उद्योगाचे डॉ.संजयदादा पाटील हे ही विधानसभा निवडणूक लढवू इच्छितात.डॉ. संजय दादांना मानणारा मोठा गट तालुक्यात दिसून येतो. महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिरढोणचे सुपुत्र आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य खासदार माने गटाचे कट्टर समर्थक प्रा. चंद्रकांत मोरे सर यांच्यासाठी खा. धैर्यशील माने आग्रही आहेत.माने गटाशी असलेल्या निस्सिम निष्ठेच्या बळावर व तालुक्यातील संपर्काच्या जोरावर प्रा. चंद्रकांत मोरे रणांगणात उतरणार आहेत. त्यांनी निवडणुकीच्या दृष्टीने मतदारसंघात जनतेशी थेट संपर्क सुरू ठेवला आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत मुसंडी मारण्याची तयारी सुरू आहे.विधानसभेच्या निवडणुकीत स्वतः माजी खासदार राजू शेट्टी उतरतात की एखाद्या नवख्या कार्यकर्त्याला संधी देतात याची उत्सुकता आहे. शेतकऱ्यांच्या घामाच्या दामासाठी केलेले आंदोलन, ऊसाला मिळवून दिलेला दर, मजबूत संघटन या जमेच्या बाजू आहेत. दुसऱ्या बाजूला पाहिले तर महाविकास आघाडीतही काही आलबेल आहे, असे चित्र दिसून येत नाही. मुख्यमंत्रीपदाच्या सारीपाटात आकडयांची जादू चालणार आहे. त्यामुळे जादा व हक्काचे मतदार संघ सोडायला कोणी सहजासहजी तयार होणार नाही. जागांच्या अदलाबदलीवर उमेदवारी निश्चित होवू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख माजी केंद्रीय कृषिमंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या मुत्सद्दीपणावर बरेचसे अवलंबून आहे. शिरोळ विधानसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी मोठया प्रमाणावर रस्सीखेच दिसून येत आहे. तसे वरवर पाहता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तगडा दावा शिरोळच्या जागेसाठी आहे. कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीची उमेदवारी माजी आमदार उल्हास पाटील निवडणुकीच्या माध्यमातून सभासदांचा मिळविलेला पाठींबा, सर्वसामान्यांच्या सुखदुःखात मिसळणारे व्यक्तिमत्व,लाघवी वाणी यासारख्या जमेच्या बाजू आहेत.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या विचाराचा वारसा, काँग्रेस पक्षांवरील निस्सीम निष्ठा, काँग्रेस नेते राहुल गांधी व जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याशी असलेली जवळीकता या जोरावर महाविकास आघाडीची उमेदवारी मिळविण्यात यश येईल असा कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे.
आघाडीतील महाविकास उमेदवारीच्या रस्सीखेचात अचानक मध्यम मार्ग म्हणून एखादा नवखा उमेदवार विधानसभेच्या मैदानात उतरविला जावू शकतो.ज्या आघाडीत शरद पवार आहेत तिथे काहीही अकस्मात घडू शकते. हे संपूर्ण देशाला माहित आहे.तसेच महिला सबलीकरण, महिलांच्या हाती राज्यकारभार सोपविण्याच्या संकल्पनेत अचानक महिला उमेदवाराचे नाव जाहीर झाल्यास आश्चर्य वाटायला नको. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शिरोळ तालुकाध्यक्षा सौ.स्नेहा वसंतराव देसाई या महाविकास आघाडीकडून महिला उमेदवार म्हणून पर्याय ठरू शकतात. उच्च विद्याविभूषीत, सुसंस्कृत,महिलांची बांधलेली मोट, अल्पावधीत महिलांसाठी राबविलेले उपक्रम, बहुजन व दलित समाजाशी असलेली जवळीकता, लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर हे शिरोळ तालुक्यात नवखे असूनही शिरोळ तालुक्यातील प्रचार शुभारंभ हेरवाडमध्ये करून प्रचाराची रणधुमाळी अखेरपर्यंत सांभाळली होती. तसेच पती वसंतराव देसाई यांनी सरपंच पदाच्या कारकिर्दीत राष्ट्रीय पेयजल योजना,प्राथमिक योगदान, शाळेसाठी दिलेले सरपंचपदाच्या भत्त्यांमधून गोरगरिबांची भरलेली घरपट्टी, विकास कामे करण्याची हातोटी,सर्व जातीधर्माशी असलेले संबंध पाहता विधानसभेच्या रणांगणांत टक्कर देवू शकतात. अशा प्रकारे सर्वच पक्षांमध्ये असणारी उमेदवारीसाठी रस्सीखेच पाहता कोणाला उमेदवारी मिळते.कोण कोणाच्या पाठीशी राहते.जात फॅक्टर या बाबींचा प्रभाव आगामी विधानसभेच्या रणांगणात निश्चित दिसून येईल. हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज भासणार नाही.