आ राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केलं धारकऱ्यांचे कौतुक

Spread the love

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दुर्गामाता दौडला लावली उपस्थिती

शिरोळ / प्रतिनिधी

येथील शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानच्या वतीने घटस्थापना ते दसरा दररोज सकाळी 5.30 वाजता ते 7.30 या काळात दुर्गामाता दौड काढली जाते.आज शनिवार 5 ऑक्टोबर रोजीच्या कार्यक्रमास माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज उपस्थित लावून धारकऱ्यांचे कौतुक केले.छत्रपती शिवाजी महाराज तख्त येथुन दौडचा प्रारंभ झाला.गणेश कल्लाप्पा वडर हे ध्वजधारी होते तर मानसिंहराव विक्रमसिंह रजपुत यांच्या हस्ते ध्वजपुजन करण्यात आले.समस्त लिंगायत समाजाच्या वतीने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत पंचायत समिती येथील शिवतिर्थाचे पुजन करण्यात आले.यावेळी श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई,कार्यवाह प्रविण चुडमुंगे, संजय शिंदे,चिमासाहेब पाटील,चंद्रशेखर चुडमुंगे,पत्रकार बाळासाहेब माळी यांच्यासह शिरोळ शहरातील हजारो तरूण धारकऱ्यांनी, महिलांनी,मुलींनी सहभाग घेतला होता.श्री गणेश मंदिर येथे आरती करून,श्री गणेश नगर मंडळ,सम्राट मंडळ, श्री.अंबाबाई मंदिर येथे आरती, वेशीतील हनुमान मंदिर यामार्गाने मार्गक्रमन करत छत्रपती शिवाजी महाराज तख्त येथे दुर्गामाता दौडीचा समारोप करण्यात आला.

error: Content is protected !!