शिरोळ पंचायत समिती कार्यालयासमोर कोंडीग्रे ग्रामस्थांचे आंदोलन
कोंडीग्रे ग्रामपंचायतीच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे ; वीज सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा
शिरोळ / प्रतिनिधी
कोंडीग्रे गावातील ३० वर्ष रहिवाशी असलेल्या काही घरांना वीज कनेक्शन मिळत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.ग्रामपंचायत स्तरावर ना हरकत दाखला मिळत नसल्याने लाईट मिळत नसल्याची तक्रार आंदोलकांची होती.त्या कुटुंबांना वीज कनेक्शन मिळावे या मागणीसाठी भारतीय जन आंदोलन सामाजिक संघटनेच्या वतीने आज शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता शिरोळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयासमोरील दालनात धरणे आंदोलन करण्यात आले.दरम्यान गटविकास अधिकारी नारायण घोलप यांच्या सूचनेनुसार कोंडीग्रेचे ग्रामसेवक एस एस मुल्ला व सरपंच यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांची समजूत काढली.घरामध्ये वीज कनेक्शन घेण्याबात महावितरण कंपनीला अधिकार आहे.याकामी ग्रामपंचायतीचे सहकार्य असेल.त्याचा पाठपुरावा करून वीज कनेक्शन घेण्यात यावे असे लेखी पत्र ग्रामसेवक मुल्ला यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व भारतीय जन आंदोलन राज्याध्यक्ष दिगंबर सकट,शिल्पा कडाळे,कुसुम चलवादे, पूनम कोठावळे,स्वाती कांबळे,जयश्री पाटील, अंजना पुजारी,भारती चालवादे,कल्पना कोळी,रंजना सूर्यगंदा, गीता कांबळे,आरती कोळी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.पंचायत समिती प्रशासनाने संबंधित महावितरण कंपनी व कोंडीग्रे ग्रामपंचायतीशी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून घेतली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र प्रधान,सुनील भोसले,जयपाल कांबळे,शाहीर आवळे,सतीश भंडारे,आलम मुल्ला,राजू कांबळे,डॉ मेहबूब बागवान,कल्पना कोळी,अतिक पटेल,प्रतिक कांबळे यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.