हातकणंगले तालुक्यातील १००३ लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर

Spread the love

हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत 1003 लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर

हातकणंगले / प्रतिनिधी

हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक शुक्रवार दि.4 ऑक्टोबर रोजी समितीचे अध्यक्ष झाकीरहुसेन भालदार यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालय हातकणंगले येथे पार पडली.सदर बैठकीत प्राप्त झालेल्या एकूण 1007 प्रस्तावापैकी 1003 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तसेच 4 प्रस्तावात त्रुटी असून सदर प्रस्ताव त्रुटींची पूर्तता करून तलाठ्यांमार्फत तात्काळ पुढील मीटिंग मध्ये सादर करण्याचे ठरले.यावेळी तहसीलदार तथा समिती सचिव सुशीलकुमार बेल्हेकर,नायब तहसीलदार संदीप चव्हाण, समिती सदस्य बाळासाहेब गायकवाड,अमोल गावडे,महेंद्र शिंदे,दौलत पाटील,सुदाम इंगवले,संदेश भोसले,तानाजी ढाले,संजय देसाई,सौ.कविता सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!