इचलकरंजी शहरातील भाजपचे कोल्हापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी शरदचंद्र पवार यांची भेट घेतल्याने इचलकरंजी शहरासह कोल्हापूर जिल्ह्यात राजकारणात खळबळ उडाली आहे.लवकरच कार्यकत्यांच्या मेळावा घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहोत अशी माहिती इचलकरंजी येथे दिली.लवकरच शेळके तुतारी हातात घेणार असे बोलले जात आहे.यावेळी हिंदुराव शेळके म्हणाले भाजपमध्ये गेल्या दहा दिवसापासून आम्हाला कोणी विचारलंच नाही आमदार आवाडे यांनी पक्षप्रवेश केला आहे.पण इथून पुढे आमदार प्रकाश आवाडे आणि आमची आरपारी लढाई असणार आहे.गेल्या तीस वर्षापासून भाजपचे मी काम करतो आहे.पण आम्हाला कोणी किंमत देत नसल्यामुळे आम्ही लवकरच निर्णय घेणार असल्याचे ही शेळके यांनी सांगितले.दरम्यान
भाजपचे माजी शहाराध्यक्ष अनिल डाळ्या माजी उपनगराध्यक्ष शशिकांत मोहिते यांच्यासह
भाजपच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांनी शेळके यांच्या घरी जाऊन घेतली भेट व त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.