जिल्हास्तरीय ‘जिम्नॅस्टीक’ स्पर्धेत शिरोळचे ब्रिलीयंट स्कूल कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम
शिरोळ / प्रतिनिधी
येथील रंगराव माने चॅरीटेबल ट्रस्ट संचालित ब्रिलीयंट इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शासकीय कोल्हापुर जिल्हा क्रिडा विभागाकडून कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या १४ वर्षीखालील वयोगटामधील जिम्नॅस्टीक स्पर्धेत वुमेन्स पेअर ग्रुपमध्ये कु.साक्षी महाडीक व कु.निधी पाटील या दोघींनी प्रथम क्रमांक व वुमेन्स ग्रुपमध्ये कु.प्रतीक्षा कोळी, कु. दिशा कोगनुळे व कु. पूर्वा गुरव या विद्यर्थीनी प्रथम क्रमांक मिळवला. तर मेन्स पेयर मध्ये कु.धनुष जाधव व कु.अंश भानुसे या विद्यार्थ्यांनी तिसरा क्रमांक मिळवला.या सर्व विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावरील जिम्नॅस्टीक स्पर्धेतसाठी निवड झाली आहे.त्याचबरोबर शिरोळ तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत ४०० मी. धावण्याच्या सर्धेत कु. वेदांतिका कट्टी या विद्यार्थ्यांनीने दुसरा क्रमांक मिळवला व तिची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाली.शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन माने यांनी विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टीकोनातून शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सर्वप्रकारच्या खेळाचे ज्ञान अवगत व्हावे यासाठी शाळेमध्ये राज्य व राष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक नेमले आहेत.याचाच परिणाम म्हणून शाळेतील विद्यार्थांचा मानसिक, बौद्धिक व शारीरिक विकास साधला जात आहे.यासाठी पालकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.कोल्हापूर जिल्हांमध्ये ब्रिलीयंट इंग्लिश मिडीयम स्कूलने या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक मिळवल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष मोहन माने संचालिका सौ. स्वाती मोहन माने,कु.तृप्ती माने,कु.पूजा माने,पी.टी.ए अध्यक्ष सतीश ढवळे व स्कूल व्यवस्थापक गजानन भोसले व सर्व शिक्षक यांनी यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन केले.या स्पर्धेसाठी क्रिडा शिक्षक भीमराव कांबळे, राज्यस्तरीय प्रशिक्षीका कु.सृष्टी सावंत यांनी विशेष कष्ट घेतले त्याच प्रमाणे सौ.प्राजक्ता माने यांनी संघ प्रमुख म्हणून काम पहिले.स्कूलचे प्राचार्य पी.एस.काकडे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.