रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी आयोजित व्होकेशनल सर्व्हिस,नेशन बिल्डर ॲवार्डचे रविवारी वितरण
शिवाजी संकपाळ, सौ सविता रेवडे,उषा खोचरे,नितीन बागुल,कल्पना माळी,रघुनाथ कदम,लेहरूलाल तेली यांचा होणार सन्मान
शिरोळ / प्रतिनिधी
येथील रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ यांच्यावतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.शिक्षकी पेशात राहून आपले वेगळेपण जपणारे व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या शिक्षकांना नेशन बिल्डर ॲवार्ड क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना क्रीडाभूषण व उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या कर्तव्यांबरोबरच सामाजिक भान जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना व्होकेशनल सर्व्हिस ॲवार्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता अर्जुनवाड रस्त्यावरील हॉटेल अशोकामधील टारे बॅकवेट हॉल येथे होणार आहे.
रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ यांच्यावतीने यावर्षी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले सौ सविता रामचंद्र रेवडे पुजारी,नितीन बागूल,सौ उषा खोचरे,या शिक्षकांना नेशन बिल्डर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.क्रीडा क्षेत्रात आपले आयुष्य खर्ची घातलेल्या शिवाजी धोंडीराम संकपाळ यांना क्रीडाभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.आपल्या व्यवसायाबरोबरच सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहणारे आचारी रघुनाथ दत्तू कदम,महिला कृषी उद्योजिका सौ कल्पना प्रवीण माळी,आईस्क्रीम विक्रेते लेहरूलाल तेली यांना व्होकेशनल सर्व्हिस ॲवार्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.पुरस्कार वितरण सोहळा रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट लिटरसी प्रमोशनचे सेक्रेटरी रो.प्रो.डॉ. प्रशांत कांबळे यांच्या हस्ते आणि युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर रो.विद्यासागर आडगाणे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार दिनांक ६ ऑक्टोंबर२०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता हॉटेल अशोकामधील टारे बॅकवेट हॉल येथे होणार आहे.तरी या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष तुकाराम पाटील (भैय्या),सचिव मेजर प्रा के एम भोसले, खजिनदार तथा पत्रकार चंद्रकांत भाट,इव्हेंट चेअरमन संजय रामचंद्र शिंदे यांच्यासह सर्व सदस्यांनी केले आहे.