“या” भागातील शेतकऱ्यांचा चिखलातील वनवास संपणार तरी कधी

Spread the love

शिरटी / प्रतिनिधी

शिरटी ते कनवाड सीमेवर असणाऱ्या मधला रोड असून या रस्त्याने शिरटी गावातील 75 टक्के शेतकरी दररोज ये जा करत असतात.या रस्त्याला जाणाऱ्या शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या रस्त्याचं सामना करावा लागतो.या रस्त्याने धड चालता येत नाही,तर शेतकरी शेतात जाऊन शेतातील कामे व रोजगारला जाणारे शेतमजूर व शेतकरी वैरण कसे आणणार या रस्त्याकडे कोणीही लोकप्रतिनिधी लक्ष देण्यास तयार नाहीत.तरी मायबाप शेतकऱ्याचा कोणीतरी विचार करावा आणि गावातील लोकप्रतिनिधीचे राजकारण बाजूला ठेवून या रस्त्यासाठी कोणी का असेना प्रयत्न करून निधी आणून लवकरात लवकर रस्ता करून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी शेतकरी अमोल बन्ने यांच्यासह शेतकऱ्यांनी आज गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता शिरटी येथे केली आहे. यावेळी शिरटी कनवाड भागातील शेतकरी शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!