“मोठी दुर्घटना” दारूच्या नशेत युवकाची रेल्वेखाली उडी पाय गेला तुटून

Spread the love

हातकणंगले तारदाळ रेल्वे स्टेशनवर दारूच्या नशेत असणाऱ्या विशाल अडसूळ वय वर्ष 23 राहणार कवठेसार या युवकाने आज गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजाण्याच्या सुमारास हातकणंगले तारदाळ दरम्यान असणाऱ्या रेल्वे खाली उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.परिणामी रेल्वे खाली उडी मारत असताना रेल्वेच्या साईडला धडकून तो बाजूला फेकला गेला व त्याचा उजवा पाय रेल्वेच्या रुळामध्ये अडकून तो कट झाला.याबाबत कोल्हापूर रेल्वे पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी
विशाल अडसूळ हा युवक हा सकाळपासूनच हातकणंगले येथील एका बार वर दारू पीत असल्याचे काही नागरिकांना पाहिले होते.दारूच्या नशेतच सदर युवकांनी रेल्वे रुळावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.परिणामी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हे बऱ्याच वेळाने लक्षात येताच त्यांनी समर्पण रुग्णवाहिकेचे स्वप्निल नरोटे यांना पाचारण करून सदर युवकास तारदाळ येथे रुग्णालयात दाखल केली परंतु त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले आहे.आत्महत्येची कारण समजू शकले नाही.

error: Content is protected !!