अवैध व्यवसायावर कारवाईचा धडाका,माणगाववाडी गावठी हातभट्टीवर कारवाई

Spread the love

हातकणंगले / सुकुमार अब्दागिरे

माणगाववाडी ता.हातकणंगले गावठी हातभटी तयार करण्यासाठी आणलेले रसायन निर्जनस्थळी आणल्याची गोपनीय माहीती हातकणंगलेचे पोलीस निरिक्षक शरद मेमाणे यांना मिळताच स्वतः माणगाववाडी येथे जाऊन हातभट्टीवर आणलेले १६०० लिटर पक्के रसायन व तयार झालेली १५० लिटर गावडी दारू व त्या ठिकाणी असलेली एक दुचाकी जप्त केले,एकूण चार हातभट्टीवर कारवाई करून एकूण 103,000/ मुद्देमाल किमतीची कारवाई करण्यात आली.हातकणंगलेचे नूतन पोलीस निरिक्षक शरद मेमाणे यांनी पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारल्यापासून अवैध धंदेवाईकांवर कारवाईचा धडाका लावून अवैध धंदेवालांचे कंबरडे मोडण्यास सुरूवात केली असून,दोन नंबर वाले यांनी चांगलाच धसका घेतला आहे.अश्या धडक कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केल जात आहे. हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील प्रत्येक गावात पेट्रोलिंग करीत अवैध धंदे करणाऱ्यावर कारवाईचा सपाटाच सुरू केला आहे.

error: Content is protected !!