आज बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता कुरुंदवाड पालिकेमध्ये साजरी करण्यात आली. कुरुंदवाड येथील पालिका सभागृहात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पाणी पुरवठा अभियंता प्रदीप बोरगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.शहरात पालिका अधिकाऱ्यांनी स्वछता मोहीम राबवली.कार्यालय संगणक अभियंता प्रणाम शिंदे,प्रदीप बोरगे,नंदकुमार चौधरी आदी उपस्थित होते.येथील पोलीस ठाण्यात महात्मा गांधी,लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस,उपनिरीक्षक सागर पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी पो.हे.कॉ सागर खाडे, फारूक जमादार,राजेंद्र पवार,शिरीष कांबळे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.येथील लॉयन्स क्लब तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला प्रांतपाल सुनील सुतार,राजेंद्र गवळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.बस डेपोतील बस वाहकांची नेत्र तपासणी करण्यात आली.पालिका चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,नावबाग रस्ता,दौलतशहा वली भाजीपाला मार्केट,भाजी मंडई सह आदी परिसरात स्वच्छता-करण्यात आली.या अभियानात माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील,आझम गोलंदाज,दयानंद मालवेकर,कुदरत भुसारी, सचिन मोहिते,जैनूल बागवान,तानाजी आलासे,टिक्काखान पठाण, मिलिंद गोरे सह आदी नागरिक उपस्थित होते.