शिरोळच्या घनकचरा प्रकल्प केंद्राचे भूमिपूजन उत्साहात

Spread the love

शिरोळ शमध्ये घनकचरा प्रकल्प केंद्राचा भूमिपूजन सोहळा उत्साहात

शिरोळ / प्रतिनिधी 

येथील शिरोळ नगरपरिषदेच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या घनकचरा केंद्राचा भूमिपूजन सोहळा महात्मा गांधी जयंती दिवशी स्वच्छता ही सेवा 2024 या उपक्रम अंतर्गत शिरोळ नगपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निशिकांत प्रचंडराव यांच्या हस्ते संपन्न झाला.

 

 

 

सदर प्रकल्पांतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्र येथे सुका कचरा प्रक्रिया करिता MRF सेंटर साठी शेड व इतर अनुषंगिक बांधकाम करणे या कामांसाठी ४७,४५,८६६/-रु निधी मंजूर असून व कंपोस्ट प्लांट साठी शेड व इतर अनुषंगिक बांधकाम करणे या कामांसाठी ३९,४१,४६४/-रुपये निधी मंजूर आहे.

 

 

 

सदर निधी स्वच्छ भारत अभियान नागरी २.० या योजने अंतर्गत मंजूर आहे. MRF शेड येथे सुक्का कचऱ्यावर प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे व कंपोस्ट शेड येथे ओला कचऱ्यावर प्रक्रिया केंद उभारण्यात येणार आहे, या प्रकल्पामुळे दसरा चौक येथील कचरा निर्मूलन करणेस गती येणार आहे.

 

 

या सोहळ्यात स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करून स्वच्छता संदर्भात प्रतिज्ञा देण्यात आली.या भूमिपूजन सोहळ्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांचे अभियंता अमन मोमीन, शहर समन्वयक साहिल मकानदार बांधकाम अभियंता श्रीधर डूबुले,

 

 

 

विद्युत अभियंता प्रमोद खोंद्रे, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे, कार्यालयीन निरीक्षक विजयकुमार मुळीक, कर निरीक्षक चंद्रकांत पाटील व अश्विनी पाटील, लेखापाल हरीपांडू कामुन, कार्यलयीन निरीक्षक संदिप चूडमुगे,कंत्राटदार आबिद गवंडी मल्लिकार्जुन बल्लारी, सर्जेराव पुंदे व सर्व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!