पु.शिरोली ग्रामपंचायत च्या वतीने सपोनि पंकज गिरी यांचा सत्कार

Spread the love

पु.शिरोली ग्रामपंचायत च्या वतीने सपोनि पंकज गिरी यांचा सत्कार

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृह येथे लोकनियुक्त सरपंच सौ पद्मजा कृष्णात करपे यांच्या अध्यक्षतेखाली शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांची पोलीस निरीक्षण पदी मुंबई येथे पदोन्नती झाल्याबद्दल जेष्ठ नेते प्रकाश कौंदाडे व संजय पाटील यांच्या शुभ हस्ते शाल व श्रीफळ देऊन
सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच महेश लक्ष्मण सूर्यवंशी यांची नवीन तलाठी म्हणून रुजू झालेबद्दल बाबासो बुधले व राजाराम करपे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी
ग्रामपंचायत सदस्या कु वसीफा हिदायतुल्ला पटेल यांनी पी जी डी एम एल टी परीक्षा पास झाल्याबद्दल लोकनियुक्त सरपंच सौ पद्मजा कृष्णात करपे यांच्या शुभहस्ते सत्कर करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली.यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ पद्मजा करपे, उपसरपंच बाजीराव पाटील,माजी उपसरपंच अविनाश कोळी,माजी उपसरपंच कृष्णात करपे, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश पाटील, एमआयडीसी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी, तलाठी महेश सूर्यवंशी, संजय पाटील,प्रकाश कौंदाडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य,सदस्या सर्व ग्रामपंचायत प्रतिनिधी सर्व ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिक सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!