उद्योजकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार – खंजीरे

Spread the love
इचलकरंजी परिसरातील वस्त्रोद्योग व्यवसायासह अन्य उद्योजकांना इंडस्ट्रियल इस्टेटने आधार दिल्यामुळे येथील व्यवसाय वाढीस चालना मिळाली.आगामी काळातही उद्योजकांना सर्व त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन अशी ग्वाही दि इचलकरंजी इंडस्ट्रियल को.ऑप.इस्टेटचे चेअरमन राहूल खंजीरे यांनी संस्थेच्या ६५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेताना संस्थेची स्थापना १९५९ साली दे.बाबासाहेब खंजीरे,कै.दत्ताजीराव कदम, कै.फुलचंद शेठ शहा यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. संस्थेने सभासदासाठी उद्योग उभारण्यासाठी सर्व प्रथम १९५९ साली ३८।। एकर जमीन महाराष्ट्र शासनाकडून संपादन केली. त्यांनतर १९७० साली ६८.२० एकर त्यानंतर १९८८ साली १०० एकर जमीन शासनाकडून घेतली.आजपर्यंत जवळपास २०७ एकर जमीन संपादित केली आहे.८५२ उद्योजक सभासदांना प्लॉट वाटप केले आहेत.उर्वरीत सभासदांसाठी तारदाळ येथील ८२ एकर जमीन संपादन करून मिळणेबाबत संस्थेने नियमप्रमाणे शासनाकडे रक्कम भरली आहे. पण यात न्यायालयीन लढाई सुरू असल्याने संचालक मंडळ आवश्यक तो निर्णय घेईल. वस्त्रोद्योग: एअरजेट लूम, रेपियर, ऑटो लूम, पॉवर लूम सायझिंग, प्रोसेसींग, इंजिनियरींग क्षेत्रातील फौंड्री, मशिन शॉप, फॅब्रिकेशन, ऑफसेट प्रिटींग, सॉमिल, हॉटेल, गोडावून, वे-ब्रिज असे उद्योग सुरू आहेत. लघु उद्योजक पाच कॉमन हॉल इमारती बांधून अल्प दरामध्ये उद्योगासाठी भाड्याने दिले आहेत. संस्थेच्या मालकीचे दोन पेट्रोल पंपही सुरू आहेत. अशा विविध उद्योगांना चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.प्रारंभी मॅनेजर प्रदिप पोवार यांनी नोटीस वाचन केले व विविध विषयांना सभासदांनी मंजुरी दिली.यावेळीसंचालक मंडळ, सभासद,उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर आभार राजू बोरगावे यांनी मांडली.
error: Content is protected !!