इचलकरंजी शहरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी शारदीय नवरात्रौत्सव काळात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्यावतीने दररोज दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार ३ रोजी घटस्थापनेपासून या दौडीला प्रारंभ होणार असून यात युवकांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, इचलकरंजीचे कार्यवाह प्रसाद जाधव यांनी केले आहे.
इचलकरंजी शहरामध्ये दरवर्षी दुर्गामाता दौड घेतली जाते देव,देश,धर्मासाठी काम करण्याची इच्छा,आकांक्षा, लढाऊपणा आजच्या तरुण पिढीत यावा.तसेच असेतू हिमाचल कश्मीर ते कन्याकुमारी हिंदुस्थान अखंड रहावा, यासाठी हजारो तरुणांनी भगवा ध्वज व शस्त्र हातात धारण करून दुर्गामाता,भारतमाता व धर्मवीरांचा जयघोष
करत तुळजाभवानी देवीच्या पायाशी मागणे मागण्याचा कार्यक्रम श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात केला जातो.त्याला श्री दुर्गामाता दौड असे म्हटले जाते.ही दौड इचलकरंजी शहरातही घटस्थापनेपासून सुरू होणार असून दसऱ्या दिवशी म्हणजेच १२ ऑक्टोबर रोजी समारोप होणार जाणार आहे.ही दौड दररोज शहराच्या विविध भागातून जाणार असून शहरातील मंदिर, सार्वजनिक नवरात्र उत्सव
मंडळांनी स्थापित केलेल्या देवीची आरती केली जाणार आहे. यावेळी महिला, नागरिकांकडून ठिकठिकाणी रांगोळी काढून व फुलांचा वर्षाव केला जातो. त्यामुळे रोज पहाटे साडे पाच वाजता येथील कॉ के.एल.मलाबादे चौकात हजारो युवक भगवा फेटा किंवा पांढरी टोपी घालून उपस्थीत राहावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, इचलकरंजीचे कार्यवाह प्रसाद जाधव यांनी केले आहे.