राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत कु. शांभवी माळकर प्रथम

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

खानापूर – आटपाडी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार स्व. संपतराव माने यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री. संपतराव माने महाविद्यालय खानापूर जिल्हा सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत शिरोळची सुकन्या कु. शांभवी श्रीकांत माळकर हिने प्रथम क्रमांक पटकावला.ती पद्माराजे ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्सची विद्यार्थिनी असून तिला रोख रू. ५००१/- स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

 

 

 

या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयाच्या ३९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये कु. शांभवी माळकर हिने ” शिक्षक , पालक , विद्यार्थी आणि आधुनिक शिक्षण व्यवस्था ” या विषयावर अत्यंत प्रभावीपणे आपले विचार मांडले. तिला महाविद्यालयाचे प्राचार्य ए. ए.मुल्ला , उपप्राचार्य टी. एस. गंगधर व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!