पु.शिरोली येथे आज पासून दुर्गामाता दौड प्रारंभ

Spread the love

पु.शिरोली येथे दुर्गामाता दौंड मध्ये ध्वजधारी व भवानी मातेची मानाची तलवार मिळवण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून आज पासून दुर्गामाता दौड प्रारंभ

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुलाची शिरोली येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने घटस्थापनेच्या आदल्या दिवशी पासून दुर्गामाता दौड चे आयोजन केले जाते.श्री दुर्गा माता दौंड २०२४ खर्या अर्थाने घटस्थापना ते दसरा अशी ९ दिवस दुर्गामाता दौड चालू होते.पण शिरोलीत आदल्या दिवशी जागर म्हणजेच मुलांना कळावे आणि दौंड मध्ये जो मानाचा ध्वज आणि भवानी तलवार हाता मध्ये मिळावी यासाठी शिवप्रभू दौंड स्पर्धा घेतली जाते.आज हि स्पर्धा भल्या पहाटे ५ वाजता घेण्यात आली.यामध्ये मुले ३० आणि मुली २६ अशा मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता या ५६ मुलांनी वेग वेगळ्या स्पर्धकांनी सहभाग घेऊन ९ दिवसाचे ध्वज धारी आणि भवानी तलवार मानकरी निवडण्यात आले.श्री विठ्ठल मंदिर गावभाग एकत्रित ऐऊन परंम पवित्र ध्वज आणि भवानी तलवार पुजन श्री ह.ब.प श्री विठ्ठल पाटील तात्या यांच्या हस्ते पुजन करून श्री दुर्गा माता दौंड गावभागातुन जागती दौंड काढण्यात आली.यामध्ये लहान मुले मुली तसेच तरुण तरूणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.आज श्री दुर्गा माता दौंड संपन्न झाला.यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिरोलीचे धारकरी यांनी शिस्त बद्ध नेटक नियोजनात आजच्या स्पर्धा व दौड पार पडली.

error: Content is protected !!