“बेस्ट बॉयलर यूजर” स्पर्धेत श्री दत्त कारखान्याला व्दितीय पारितोषिक

Spread the love

महाराष्ट्र शासन कामगार विभाग बाष्पके संचालनालयाने आयोजित केली होती स्पर्धा

शिरोळ / प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन कामगार विभाग बाष्पके संचालनालय यांच्या तर्फे आयोजित “बेस्ट बॉयलर यूजर” स्पर्धेत श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याला व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात बाष्पके संचालनालयचे मुख्य संचालक धवल अंतापूरकर व सहसंचालक जी.डी.वानखेडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन कारखान्याला गौरवण्यात आले.

 

 

दरम्यान या स्पर्धेसाठी कारखाना क्षेत्र पाहणी करून विविध गोष्टींची माहिती घेऊन कामगार विभाग बाष्पके संचालनालय मार्फत गुण देण्यात आले होते.बाष्पकांचा सुरक्षित आणि कार्यक्षम वापर कसा करता येईल या हेतूने नवनवीन तंत्रज्ञान, मशीन यांची अद्यावत माहिती आणि रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी व

 

 

 

तसेच बाष्पके उद्योगाला चालना देण्यासाठी बाष्पके संचालनालयातर्फे “बॉयलर इंडिया – २०२४” या आंतरराष्ट्रीय चर्चासत्र व प्रदर्शनीचे आयोजन दिनांक २५ ते २७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत सिडको प्रदर्शन आणि परिषद केंद्र, वाशी, नवी मुंबई येथे करण्यात आले होते. हा कार्यक्रम भारतातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाष्पके उद्योगातील विविध प्रगती, नवीन तंत्रज्ञान, आणि यशस्वी प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ होते.

 

यामध्ये अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले.या स्पर्धेमध्ये वीजनिर्मिती केंद्रे, सहवीज निर्मिती, साखर कारखाने, केमिकल उद्योग, टेक्सटाईल प्रोसेसिंग व अन्य लहान उद्योग अशा ६ क्षेत्रांचा समावेश केला होता. यामध्ये
महाराष्ट्रातील १८५ बॉयलर सहभागी झाले होते.

 

 

 

यापैकी ४१ बॉयलर साखर उद्योग क्षेत्रामधून होते. यातून अंतिम फेरीसाठी ९ बॉयलर पात्र ठरले. या ९ कारखान्यांमधून श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.शिरोळच्या बॉयलरला व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

 

 

 

श्री दत्त कारखान्याचे को-जनरेशन मॅनेजर विजयकुमार इंगळे, ऑपरेशन मॅनेजर रेंकप्पा मायकल आणि इंजिनिअर विनायक दबडे यांनी पारितोषिक स्वीकारले.
कोल्हापूर विभागाचे सहसंचालक विनोद बारमाटे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

 

 

 

 

तसेच या स्पर्धेमध्ये मिळालेल्या उत्तुंग यशामध्ये श्री दत्त उद्योग समूहाचे मार्गदर्शक उद्यानपंडित गणपतराव पाटील, श्री दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हॉईस चेअरमन शरदचंद्र पाठक, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांच्याकडून मिळालेले प्रोत्साहन व मार्गदर्शन महत्वाचे ठरले. तसेच सर्वच विभागाचे खाते प्रमुख व अभियंते यांचे सहकार्य मोलाचे ठरले.

error: Content is protected !!