फोनवर बोलणे बेतले जीवावर… वीज शरीरात घुसून युवकांचा मृत्यू

Spread the love

नवे पारगाव इथं नितीन मानसिंग भोसल या 30 वर्षीय तरुणांचा मृतदेह आढळून आलाय,मृतदेहाच्या अंगावर चे कपडे फाटले असून अंगावर काही ठिकाणी मारहानीच्या खुणा आहेत तसच कानातून रक्तश्राव ही झालेला आहे. त्यामूळ हा घातपात असावा असा अंदाज स्थानिकांतून वर्तवला जात होता.पण वैद्यकीय अहवालानुसार त्याच्या अंगावर विज पडून त्याचा मृत्यू झाल्याचे आज स्पष्ट झाले असल्याची माहिती आज

वडगाव पोलिस ठाण्यातुन मिळाली,याबाबत अधिक माहिती अशी की, हातकलंगले तालुक्यातील नवेपारगाव इथल्या विनय रेसिडेन्सीच्या समोर भोंडया माळावर आज मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी नितीन मानसिंग भोसले या 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आलाय,याबाबतची माहिती वडगाव पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली,तिथं त्यांना नितीन भोसलेचा मृतदेह त्याच्या मोटरसायकल सहित आढळून आला , नितीनच्या अंगावरील कपडे फाटले होते.तर त्याचा डाव्या दंडावर तसेच पोटावर काळे निळे वळ उठलेले होते.पोलिसांनी त्यांच्या खिशातील  आधार कार्ड वरून नितीनची ओळ्ख पटवली आहे.इथंच अगदी हाकेच्या अंतरावर काही फिरस्ती मंडळी तंबू मारून रहात आहेत.पण त्यांना या संदर्भात काहीच माहिती नाही.नितीन हा मूळचा पन्हाळा तालुक्यातील मोहरे गावचा रहिवाशी असून तो सध्या त्याच्या कुटुंबासोबत वारणा नगर इथं हॉटेल वरेकरच्या पाठीमागे रहात होता.स्वभावानं शांत आणि मनमिळावू आशा नितीनच्या बाबतीत असा घात पाताचा  प्रकार घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.वडगाव पोलिसांनी तो मृतदेह नवे पारगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयात नेला होता.  वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विच्छेदन केल्यानंतर सोमवारी रात्री या परिसरात विजेच्या कडकडाटासह प्रचंड पाऊस पडला होता. यावेळी वीज कडाडून पडली होती.यावेळी नितीन मोबाईलवर बोलत असल्याने वीज त्याच्या कानातून घुसून फुफुसात आणि पोटात शिरली होती.त्यामुळे फुफ्फसासह शरीराचा अन्य भाग जळून खाक झाला होता.त्यामुळे हा घातपात नसून अपघाती मृत्यू असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.त्यामुळे पोलिसासह नागरिकांच्या मध्ये उठलेला संशय कल्लोळ थंड झाला.नितीनच्या पश्चात आई,  वडील,बहीण, पत्नी आणि 4 महिन्याचा मुलगा असा परिवार आहे.याबाबत वडगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.

error: Content is protected !!