जयसिंगपूर / प्रतिनिधी
डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील सोशल फाउंडेशन यांच्यावतीने नवरात्रोत्सवाच्या काळात शिरोळ तालुकास्तरीय भव्य दांडिया रास गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी तयार करण्यात येणाऱ्या जयसिंगपूर येथील मैदानाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.डॉ.आप्पासाहेब उर्फ सारे पाटील सोशलफाउंडेशनच्यावतीने जयसिंगपूर येथील मालू ग्राउंड येथे शिरोळ तालुकास्तरीय दांडिया रास गरबा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर ते शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर 2024 या कालावधीत दांडिया रास गरबा स्पर्धा होणार आहेत.या स्पर्धेसाठी मैदान तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.या मैदानाचे भूमिपूजन जयसिंगपूरचे उद्योगपती राजेंद्र मालू यांच्या हस्ते करण्यात आले.
।यावेळी माजी नगरसेवक व उद्योगपती अशोकराव कोळेकर,माजी नगराध्यक्ष अमरसिंह निकम, माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव घुणकीकर,संजय पाटील कोथळीकर, युनुस डांगे, रघुनाथ देशिंगे, सर्जेराव पवार, युवानेते वरूण पाटील,वरद पाटील,संभाजी ब्रिगेड शिरोळ तालुकाध्यक्ष अक्षय पाटीलसामाजिक कार्यकर्त्या साजिदा घोरी,सामाजिक कार्यकर्ते विजय माणगांवे,
राजू उर्फ यल्लाप्पा कोळेकर,इकबाल सुतार, रंगराव पवार, संजय चौगुले, सागर म्हेतर, अमोल धुमाळ, वीरेंद्रसिंह निकम, अशोक घोरपडे,अमित पाटील,राजू घोरी, प्रसाद उर्फ नाना हेगिष्टे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
शिरोळ तालुकास्तरीय दांडिया रास गरबा स्पर्धेसाठी तालुक्यातील अनेक नामवंत संघ सहभागी होणार आहेत. तसेच या स्पर्धेच्या काळात नाटक मालिका चित्रपट क्षेत्रातील मान्यवर कलाकार उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिक देण्यात येणार आहेत. तसेच या काळात आर्केस्ट्रा स्वरांजली लाईव्ह यांचा मराठी हिंदी चित्रपट गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. मैदानावर भव्य शामियाना प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी व्यासपीठ तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.