आजी-माजी खासदार आमदारांच्या विरोधात शंकध्वनी आंदोलन

Spread the love

इचलकरंजीसह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मायक्रो फायनान्स च्या माध्यमातून महिलांना कर्ज दिली जातात कर्जाचा एक हप्ता जरी चुकला तरी फायनान्स कर्मचारी वसुलीसाठी रात्री अपरात्री घरी येऊन तगादा लावत असतात महिलांना उद्धट बोलणे यासारखे प्रकार होऊ लागले आहे.घरातील भांडीकुंडी घेऊन जाण्याचे  प्रकार ही घडले आहेत.त्यामुळे संतप्त छत्रपती शासन महिला आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता

प्रांतकार्यालयावर महिलांचा भव्य मोर्चा काढण्यात आला व मागणीची निवेदन प्रांत अधिकारी मोसमी चौगुले यांना देण्यात आले.छत्रपती शासन महाराष्ट्र राज्यच्या अध्यक्षा दिव्याताई मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली आज भव्य प्रांत कार्यालयावर महिलाचा मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा महात्मा गांधी पुतळा चौक ते जनता बँक चौक ते प्रांत कार्यालय ते शिवतीर्थ पुन्हा प्रांत कार्यालय असा काढण्यात आला होता. यावेळी आजी-माजी खासदार आमदारांच्या विरोधात शंकध्वनी आंदोलन करण्यात आले.यावेळी सुमारे हजार ते पंधराशे महिला या मोर्चामध्ये सामील झाल्या होत्या मायक्रो फायनान्स वर   योग्य ती कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी महिला  पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

error: Content is protected !!