इचलकरंजी शहराला मंजूर असलेल्या सुळकुड पाणी योजनेची अंमलबजावणी व्हावी याकरिता गेल्या पाच दिवसांपासून सुरु आहे.याचाच भाग म्हणून आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता आंदोलन स्थळापासून प्रांत कार्यालयापर्यंत मुकमोर्चा
काढून प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांना निवेदन देण्यात आले. इचलकरंजी शहरातील गांधी पुतळ्यानजीक गेल्या पाच दिवसांपासून सुळकुड पाणी योजना प्रश्नी धरने आंदोलन सुरु आहे.इचलकरंजी शहरास मंजूर असलेली सुळकुड पाणी योजनेची अंमलबजावणी व्हावी याकरिता गेल्या दीड वर्षापासून प्रयत्न विविध आंदोलन करुन तसेच वारंवार निवेदन देऊन ही अद्याप शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळाले नाही.त्याचबरोबर मंजूर असलेल्या सुळकुड पाणी योजनेची अंमलबजावणी व्हावी यासाठी वेगवेगळी आंदोलने होत असताना आपले गतिमान शासन उदासीन का आहे? असा सवाल शहरवासियांना पडलेला आहे.दरम्यान यावेळी सुळकुड पाणी कृति समितीच्या वतीने प्रसाद कुलकर्णी यांनी एका कागल मतदार संघाच्या आमदारकीसाठी आपण आमच्या ४ लाख लोकसंख्येच्या नागरिकांचे पाणी का पळवत आहात? वस्त्रोद्योगाचे मॅचेस्टर व हजारो लोकांना रोजगार देणाऱ्या इचलकरंजी शहरास पाणी देण्याबाबत आपण उदासीन का आहात? एकीकडे रक्तपाताची भाषा करणारे,इचलकरंजी शहराची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणारे मोकाट आहेत पण पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या सर्वसामान्य जनतेवर आपण राजकीय दबावातून गुन्हे नोंद करत आहात हे कितपत योग्य आहे? असा संतप्त सवाल मूक मोर्चा काढत प्रशासनाला केला.तसेच तातडीने शहरासाठी मंजूर असलेल्या योजनेची अंमलबजावणी करावी अन्यथा ८ दिवसात जर आपण योजनेबाबत कार्यवाही न केल्यास आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत व त्याची जोरदार जनजागृती करू असा इशारा अभिजीत पटवा यांनी दिला.यावेळी नागरिक मंच इचलकरंजी व सुळकुड पाणी कृति समिती चे पदाधिकारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.