शिरोळ पंचगंगा नदीघाट सुशोभीकरणाकरिता मिळणार ५ कोटीचा निधी

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

येथील पंचगंगा नदीघाट सुशोभीकरणाकरिता शासनाकडून निधी मंजूर व्हावा यासाठी प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्यात आला त्यानुसार येत्या दोन दिवसात पंचगंगा नदीघाट सुशोभीकरणाकरिता ५ कोटीचा निधी मंजूर होणार असल्याची माहिती शिरोळचे माजी प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

 

यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष पाटील म्हणाले की पंचगंगा नदीघाटाची प्रचंड दुरावस्था झाली आहे.याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता.पंचांगा नदीघाटाची दुरुस्ती व सुशोभीकरण करणे आणि संरक्षक भिंत बांधणे या कामी निधी मिळावा यासाठी सातत्याने आपला पाठपुरावा सुरू होता.शासन स्तरावर निधी मिळण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे येत्या दोन दिवसात पंचगंगा नदीघाट दुरुस्ती सुशोभीकरण आणि संरक्षित भिंत बांधण्यासाठी ५ कोटीचा निधी मंजूर होणार अशी माहिती शेवटी पाटील यांनी दिली.

error: Content is protected !!