ऊस हंगाम 2022/23 मधील ठरलेला दुसरा हप्ता 100 रुपये 50 रुपये तातडीने मिळावा म्हणून 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पासून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानासमोर बेमुदत उपोषण आम्ही सुरु करणार आहोत.गत हंगामाच्या तोंडावर त्यांनीच कारखान्याने आणि संघटना यांच्यात मध्यस्थी करून दोन महिन्यात शासनाच्या परवानगीने देण्याचे मान्य केले होते.जिल्ह्यातील 7 कारखान्यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवून 7 महिने झाले पण अजून शासनाने मान्यता दिलेली नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना ते पैसे मिळालेले नाहीत.शासनाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही पालकमंत्री मुश्रीफ यांना भेटून दोन वेळा आणि 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करून तुम्ही पाठपुरावा करून किमान
7 कारखाण्यांचे प्रस्ताव मंजूर करून पैसे द्यायला लावा म्हणून सांगितले पण त्यांच्या कडून प्रतिसाद नसल्याने आम्ही नाईलाज म्हणून त्यांच्या घरासमोर उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी दिली.