कै श्रीपती माने यांच्यामुळेच शेतीचा परिसर हिरवागार : डॉ दगडू माने

Spread the love

कै श्रीपती माने यांचे शेतकऱ्यांसाठी आयुष्य खर्ची : डॉ दगडू माने

शिरोळ येथे ( कै ) श्रीपती पांडू माने कृष्णामाई सहकारी पाणी पुरवठा संस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत ; सर्व विषयांना मंजुरी

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळचे माजी उपसरपंच कै श्रीपती माने (अण्णा ) यांनी सामाजिक व कृषी क्षेत्रात काम करताना मागास व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेतीची पाणी योजना सुरू केली.शेतकरी हितासाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातले असून त्यांच्या दूरदृष्टीमुळेच शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचा परिसर हिरवागार झाला आहे.त्यांनी केलेल्या आदर्शवत कार्याची परंपरा कायम ठेवून शेतकरी सभासदांच्या उत्कर्षासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशी ग्वाही चेअरमन डॉ दगडू श्रीपती माने यांनी दिली.

 

 

येथील कै श्रीपती पांडू माने कृष्णामाई सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या कार्यालयात ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी चेअरमन डॉ दगडू माने बोलत होते.संस्थेचे सचिव सर्जेराव माने यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली.यावेळी इतर सहकारी पाणी पुरवठा संस्थापेक्षा संस्थेची पाणीपट्टी आकारणी अल्प असल्याने चालू वर्षीच्या पाणीपट्टी दरात १ हजार रुपये दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
चेअरमन डॉ.दगडू माने म्हणाले,कृष्णामाई पाणीपुरवठा संस्थेला कै श्रीपती माने यांचे नाव देऊन सभासदांनी त्यांच्या कर्तुत्वावर विश्वास व्यक्त केला.ही बाब अभिमानास्पद आहे.कै.श्रीपती अण्णानी श्रमाला महत्व देऊन विश्वास व प्रामाणिकपणा जोपासला होता.हीच विचारधारा जोपासून शेतकऱ्यांना अल्पदरात शेतीला पाणी देत आहोत.यापुढेही शेतकरी हिताचे धोरण राबविताना सभासदांनी साथ द्यावी असे अवाहन डॉ माने यांनी केले.या सभेस व्हाईस चेअरमन रामचंद्र माने, लक्ष्मण माने,राजेंद्र दाभाडे,गजानन माने,चंद्रशेखर कोळी, नरसिंगा कोळी,सचिन गंगाधर,राजेंद्र दाभाडे,शिवाजी माने यांच्यासह सभासद व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!