माझी वसुंधरा अभियानात कुरुंदवाड नगरपरिषद प्रथम

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

राज्य शासनाच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय माझी वसुंधरा अभियानात कुरुंदवाड नगरपरिषदेने पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकावत यश संपादन केले आहे.यामुळे पालिकेला 75 लाखाचे बक्षीस जाहीर झाले आहे.या पुरस्कारामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा डंका पुन्हा वाजला आहे.दरम्यान नुकताच राज्य शासनाच्यावतीने माझी वसुंधरा योजनेचा निकाल जाहीर केला आहे. कुरुंदवाड पालिकेने यावर्षी ही यश आल्याने पालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
येथील नगर पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी टीना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेत पर्यावरण पूरक शहराकडे वाटचाल केली आहे.शहरात वृक्ष लागवड, पर्यावरण पूरक बोलक्या भिंती,चौकांची स्वच्छता,शहरात स्वच्छ शहर सुंदर शहर असे फलक, शहरातील रहिवासी क्षेत्रात असलेल्या खुल्या जागांमध्ये नगरपालिकेने उद्याने उभी केली असून ओल्या व सुख्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे.शहर हागणदारी मुक्त, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन,वनसंवर्धन,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन,जैवविविधता,विजेचा अपव्यय टाळण्यासाठी प्रोत्साहन देणे असे विविध प्रकल्प राबवलेले आहेत.यामध्ये पंधरा ते पंचवीस हजार लोकसंख्या गटामध्ये येथील नगर परिषदेचा पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे.त्यामुळे पालिकेला 75 लाखाचे बक्षीस मिळाले आहे.शहराच्या विकासात मोठी भर पडणार आहे.या यशासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी टीना गवळी,पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता प्रदिपकुमार बोरगे,कार्यालय निरीक्षक प्रणाम शिंदे,स्वच्छ्ता निरीक्षक अमोल कांबळे,मुकादम विक्रम हेगडे,श्रीमती नम्रता कांबळे,सर्व कर्मचारी वर्गअधिकारी,कर्मचारी,सफाई कामगार यांनी अथक परिश्रम घेतल्याने हे यश मिळाले आहे.या यशासाठी नगरपरिषद अधिकारी,कर्मचारी,स्वच्छता कर्मचारी यांचं शहरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!