समाजभान जपणारे नेतृत्व म्हणजे डॉ अरविंद माने – चंद्रकांत भाट

Spread the love

माने कुटुंबियांकडून राजाराम विद्यालय बालोद्यान साहित्याची मदत

शिरोळ / प्रतिनिधी

सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये त्यांना खाजगी शिक्षण संस्थेप्रमाणे सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता सातत्याने मदतीचा हात पुढे करणारे समाजभान नेतृत्व म्हणजे डॉ.अरविंद माने होय असे प्रतिपादन राजाराम विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य चंद्रकांत भाट यांनी केले.
भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष व शिरोळचे माजी नगरसेवक डॉ अरविंद माने यांचे सुपुत्र चि.समयनय माने यांच्या वाढदिवसानिमित्त राजाराम विद्यालयात अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.यावेळी चंद्रकांत भाट हे बोलत होते.
वाढदिवसानिमित्त समयनय माने याचा सत्कार करून केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या.माने कुटुंबाकडून विद्यार्थ्यांना चॉकलेट व पेनचे वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ अरविंद माने बोलताना म्हणाले की शाळेतील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण सुविधा मिळाव्यात यासाठी माने कुटुंबियांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वीही शाळेतील भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी माझ्या परीने मदतीचा हात दिला आहे.शाळेतील बालोद्यानाकरिता लागणारे साहित्याची भेट देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.स्वागत शाळेचे मुख्याध्यापक सनी सुतार यांनी केले यावेळी सौ सारिका माने दे.भ.र.कु.शि.मा.सहकारी सूतगिरणीचे संचालक बबन बन्ने, माने केअर डायग्नोस्टिक सेंटरचे भाग्योदय ढवळे, पत्रकार बाळासाहेब कांबळे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे, उपाध्यक्षा सौ शितल जगदाळे, सदस्या प्रियांका इंगळे, भाग्यश्री चव्हाण, सुषमा सावंत, सदस्य सचिन सावंत, मारुती जाधव, सुरेश गावडे, अध्यापक रवींद्र वाघ, सौ प्रतिभा साळुंखे,सौ दिपाली गावडे,दादासो आवळे,अमरजीत कोगे,राहुल माने, राघव सुतार,सुशील पाटील, दगडू जाधव यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार त्रिशला येळगुडे यांनी मानले सूत्रसंचालन सुनील घुमान्ना यांनी केले.

error: Content is protected !!