हेरवाड / प्रतिनिधी
शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्विनी अभियानांतर्गत सर्व वयोगटातील महिलांसाठीचे महिलांचे कायदे विषयक हक्क व अधिकार जनजागृती सत्र मजरेवाडी रोड कुरुंदवाड येथे संपन्न झाले.
यशस्विनी अभियानांतर्गत अॅड.आसावरी कुलकर्णी, अॅड.किशोरी भोसले,पल्लवी वाघ,विदुला पंडितराव, वर्षा भोसले यांनी महिलांना कायदेविषयक हक्क व अधिकार यांविषयी सखोल मार्गदर्शन केले.महिलांना जनजागृती करण्याचे अभियान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर सुरु आहे.त्या अनुषंगाने शिरोळ तालुक्यातील महिलांसाठी कुरुंदवाड येथे कार्यक्रम आयोजित केला होता.
जनजागृती सत्रासाठी जिल्हाध्यक्षा आश्विनी माने प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या की, देशाचे नेते शरदचंद्र पवारसाहेब यांच्या विचाराने देशात महिलांच्या सबलीकरणाच्या विविध योजना सुरु झाल्या.महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांचे योगदान अलौकीक आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस कार्यरत आहे.
महिलांच्या उन्नतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष नेहमीच अग्रेसर आहे.तालुकाध्यक्षा स्नेहा देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
शिरोळ तालुकाध्यक्षा स्नेहा देसाई म्हणाल्या की कायदे विषयक हक्क जनजागृती सत्रामुळे ग्रामीण भागातील महिलांना आपल्या अधिकारांविषयी जाणीव जागृती होवून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देतील.सुखमय व आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल.
जनजागृती सत्र यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्षा सुमन भिमराव चव्हाण,मृणालिनी विक्रमसिंह जगदाळे, याज्ञसेनी घोरपडे,मधुमती पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.या जनजागृती अभियान सत्रासाठी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.