डॉ.अरविंद माने तरुणांचे ऑयडॉल नेतृत्व

Spread the love

 

डॉ.अरविंद माने हे तरुणांच्यामध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले ऑयडॉल नेतृत्व आहे.तरुण वर्गात त्यांची लोकप्रियतेची मोठी क्रेज आहे.नम्र स्वभाव आणी प्रत्येक माणूस आपल्या कुटुंबातील समजून त्याच्या सुखदुःखात सहभागी होण्याची त्यांची कार्यशैली गरजूंना मदतीसाठी पुढे केलेल्या हात प्रत्येक जण आरोग्य संपन्न जीवन जगावे यासाठी त्यांचे सुरू असलेले प्रयत्न या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेला डॉ.अरविंद माने म्हणजे आपला जवळचा मित्र आहे असे वाटतं.तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे,तरुण व विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीत त्यांच्या पाठीशी उभे राहणे यामुळेच डॉ.अरविंद माने हे सर्वांनाच आपला हक्काचा माणूस वाटतात.अशा कृतिशील युवा नेतृत्वास वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…

 

 

एक संवेदनशील आणि सामाजिक भान असणार्‍या कृतिशील राजकीय युवा नेतृत्वाचा आज वाढदिवस. अगदी कमी वयात डॉ.अरविंद अशोकराव माने यांनी आपले सामाजिक कार्य करताना उद्याच्या सक्षम आणि सर्वगुणसंपन्न नेतृत्वाची चुणूक दाखवली आहे. विलक्षण बुद्धीचातुर्य संघटनकौशल्य समाजातील गोरगरिबांशी असलेले जिव्हाळाचे नाते या त्रिवेणी संगमामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या हृदयसिंहासनावर अरुढ झालेले युवा नेते म्हणजेच डॉ.अरविंद माने होय. कोणतीही मोठी राजकीय सत्ता नसताना त्यांनी केलेले शाश्वत विकास कार्य अनमोल आहे.

 

 

 

तसेच आजच्या तरुण पिढीला आदर्शवत ठरत आहे.यामुळे नेहमीच त्यांच्या सभोवती युवकांचा गराडा असतो कार्यकर्ते जोडायचे नाही तर ते टिकवण्याची शिकवण वडिल कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य दलित मित्र डॉ.अशोकराव माने यांच्याकडून मिळाली असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणारे डॉ.अरविंद माने हे कर्तुत्वसंपन्न युवा नेतृत्व आहे.

 

 

 

अल्पावधीतच शिरोळ परिसरातील राजकीय पलटावर आपल्या नेतृत्वगुणाचा ठसा उमटविणारे कर्तबगार युवा नेतृत्व व भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर पूर्व ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आणि शिरोळचे माजी कर्तव्यदक्ष नगरसेवक डॉ.अरविंद अशोकराव माने यांनी आपल्या कार्यशैलीने सर्वसामान्य जनतेची मन जिंकली आहेत. यामुळे त्यांच्या सभोवताली नेहमीच कार्यकर्त्यांचा व जनतेचा गराडा असतो.

 

 

 

शिरोळ तालुक्याला राजकारण आणि समाजकारणाची समृद्ध परंपरा आहे. यामध्ये अनेक दिग्गज नेतेमंडळींचा जनसेवेचा वसा आणि वारसा बुलंद करण्याचे काम येथील तरुण पिढी प्रामाणिकपणे करीत आहे. यामध्ये शिरोळचे माजी नगरसेवक व विविध संस्थांचे पदाधिकारी डॉ.अरविंद माने यांचा नामोल्लेख आवर्जून करावा लागतो.

 

 

 

जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांचे राहणीमान उंचावण्याकरिता सातत्याने प्रयत्नशील राहत असल्याने ते जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यांनी आपल्या कार्यशैलीतून राजकीय सामाजिक यासह विविध क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातील आश्वासक नेतृत्व म्हणून सध्या पाहिले जात आहे.

 

 

 

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य आणि विविध सहकारी संस्थांचे चेअरमन दलित मित्र डॉ.अशोकराव माने आणि शिरोळ ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य सौ.रेखादेवी माने याचे सुपुत्र असलेले डॉ.अरविंद माने यांना लहानपणा पासूनच घरातून जनसेवेचा वारसा लाभला आहे.

 

 

 

माने दापत्यांनी केलेल्या संस्काराच्या शिदोरीवरच डॉ.अरविंद माने यांनी आपल्या सामाजिक व राजकीय जीवनाची वाटचाल सुरू केली आहे.वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस ही उच्च पदवी घेऊन जनतेच्या आरोग्य सेवेचे व्रतही त्यांनी निस्वार्थपणे स्वीकारले आहे. या माध्यमातून त्यांनी अनेक आरोग्य शिबिराचे आयोजन करून अनेक नागरिकांच्यावर मोफत औषधोपचार करून त्यांना जगण्याचे बळ दिले आहे.

 

 

 

विशेषता महिलांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करून त्यांना जगण्याचे बळ देण्याचे प्रयत्न केले यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्यात सुद्धा ते लोकप्रिय बनले आहेत.
नगरसेवक डॉ.अरविंद माने यांना दलित मित्र डॉ.अशोकराव माने यांचा राजकीय वारसा असला तरी ते केवळ घराण्याच्या वारशावरचे ते राजकारण करीत नाहीत. स्वतःच्या विचारातून आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर राहत आहेत.

 

 

 

 

राजकारणात मिळालेले पद ही केवळ सत्ता उपभोगण्यासाठी मिळालेले संधी नसते तर या पदाच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने लोककल्याण्याची कामे व्हावीत हा विचार घेऊन डॉ.अरविंद माने हे राजकारणात सक्रिय झाले आहेत. वडील डॉ.अशोकराव माने व आई सौ.रेखादेवी माने यांचा राजकारण आणि समाजकारणाचा लाभलेला सशक्त वारसा आणि पत्नी सौ.सारिका माने यांची लाभलेली साथ यामुळे डॉ.अरविंद माने हे सहकार,सामाजिक,राजकीय,आरोग्य,औद्योगिक, क्रीडा यासह विविध क्षेत्रात फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन आपल्या विचाराने काम करत सर्वसामान्यांचे जीवन उंचावण्यासाठी कार्यरत राहत आहेत.

 

 

 

यामुळे जनसामान्यांच्या हिताचे विधायक राजकारण करणारे कृतिशील युवा नेतृत्व अशी ओळख डॉ.अरविंद माने यांची झाली आहे. नगरसेवक पदाचा काय पूर्ण झाल्यानंतरही त्यांनी शिरोळातील जनतेचे प्रश्न अडचणी सोडवण्यासाठी आजही ते रात्रीचा दिवस करतात तसेच शहराच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनेतून निधी उपलब्ध करून तो निधी योग्य कामासाठी खर्च करून लोकोपयोगी काम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे.

 

 

 

राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी डॉ.अरविंद माने हे दलितमित्र डॉ.अशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यात हिरारीने सहभाग घेत असत आनंदवन येथील कुष्ठरोग्यांना धान्य व कपडे पाठवणे, आरोग्य शिबिरे घेऊन जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम, गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत यासह अन्य उपक्रम राबवून सामाजिक कार्यात वेगळा ठसा उमटिवला. त्यांनी केलेल्या कार्याची दखल शिरोळच्या जनतेने सुद्धा घेतली.

 

 

 

शिरोळ नगरपरिषदेच्या पहिल्या निवडणुकीतच प्रभाग क्रमांक दोन मधील जनतेने अपक्ष उमेदवार असलेले डॉ.अरविंद अशोकराव माने यांना मोठे मताधिक्य देऊन आपल्या प्रभागाचा जनसेवक बनवला प्रभागातील नागरिकांनी टाकलेल्या विश्वासास पात्र राहून नगरसेवक डॉ.अरविंद माने यांनी प्रभागातील मूलभूत प्रश्न आणि जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यावर त्यांचा भर राहिला. प्रभागातील रस्ते, गटर्स, दिवाबत्ती, औषध फवारणी, स्वच्छता मोहीम ही कामे मार्गी लावली. तसेच नगरसेवक आपल्या दारी या उपक्रमामुळे नेहमीच ते जनसंपर्कात राहत असल्याने प्रभागातील सर्वांनाच आपला नगरसेवक आहे असे वाटते.

 

 

 

 

कोरोना महामारीच्या काळात एक डॉक्टर या नात्याने त्यांनी प्रभागात औषध फवारणी करणे, नागरिकांना मास्क व सॅनिटायझर वाटप, गरजू रुग्णावर उपचार करणे, रुग्णांना त्या काळात बेड उपलब्ध करून देणे अशी आरोग्यसेवेची कामे करत या महामारीत कोरोना योद्धा म्हणून जनतेच्या आरोग्याची काळजी त्यांनी घेतली.

 

 

 

अपयशानं खचून जायचं नाही आणि यशांन हुरळून जायचं नाही, सदैव निरपेक्ष भावनेने लोकांच्या सुख दुःखात सहभागी होत काम करत राहायचं. संघर्षाशी दोन हात करण्याची तयारी ठेवली. सर्व काही करता येतं हा कानमंत्र घेऊन नगरसेवक डॉ.अरविंद माने जिल्ह्याच्या राजकारणात यशस्वी होत आहेत. त्यामुळे त्यांच्या हातून समाजाभिमुख कार्य घडत आहे.

 

 

भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष, शिरोळ नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ तालुका मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी व छत्रपती शाहू को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेटचे संचालक,रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीचे सदस्य यासह विविध संस्थांचे प्रतिनिधित्व करीत असताना उदयमुख तरुणांना एकत्र करून राजकारणात समाजकारणाची विधायक जोड देऊन आपली व आपल्या भागाची प्रगती व्हावी यासाठी डॉ.अरविंद माने हे अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडे कणखर व कर्तबगार नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे.

 

 

 

जागतिक सामाजिक संस्था असणार्‍या रोटरी क्लबमध्ये सहभागी होऊन रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत.यामधून शिक्षण,आरोग्य,पर्यावरण या विषयाला महत्त्व देऊन त्यांनी आपले सामाजिक काम पुढे सुरू ठेवले आहे.विकासाभिमुख कामे किती धडाडीने करता येतात याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ.अरविंद माने विरोधकांची जिरवण्यासाठी राजकारणाचा उपयोग करायचा नसतो तर राजकारणाला लोकसेवेची संधी समजून लोकांसाठी समर्पित भावनेने काम करणे म्हणजे राजकारण,सामाजिक व सहकार आणि राजकारणाची सांगड घालत लोकसेवेची वाट प्रशस्त करणारे जिल्ह्यातील युवा नेतृत्व म्हणून पुढे येत आहे.कर्तुत्वसंपन्न युवा नेतृत्वास वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा

शब्दांकन
चंद्रकांत भाट

error: Content is protected !!