शिरोळ / प्रतिनिधी
येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने दिनांक १ ऑक्टोबर २०२४ रोजी ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार डॉ वसंतराव केशव मोरे व सौ मीनाक्षी वसंतराव मोरे या दापत्यांना प्रदान करण्यात येणार आहे. शिरोळ भूषण दिलीपराव रामचंद्र माने व अशोकराव बाबुराव टारे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते खंडेराव पार्वती शंकर हेरवाडे यांना समाजभूषण पुरस्कार व सयाजीराव रघुनाथ माने यांना उद्योग भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख आणि सहकारमहर्षी गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक १ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता अर्जुनवाड रस्त्यावरील टारे क्लब हाऊस येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.या समारंभासाठी माजी खासदार राजू शेट्टी,माजी आमदार उल्हास पाटील, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य दलित मित्र डॉ अशोकराव माने, दत्त कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे, संचालक शिवाजीराव माने देशमुख, शिवव्याख्याते उदय मोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी परिसरातील नागरिकांनी या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष आत्माराम मुळीक,उपाध्यक्ष सतीश आडगुळे, खजिनदार राजाराम कुंभार यांच्यासह सर्व संचालक मंडळ आणि सदस्यांनी केले आहे.