‘दादा’ शेतकऱ्यांना परवडणारा दर हा द्यावा लागेल – आंदोलन अंकुश

Spread the love

शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखाण्याच्या वार्षिक सर्व साधारण सभेत संचालक गणपतराव पाटील यांनी या हंगामात एफ आर पी एकरकमी देणार म्हणून घोषणा केली. कारखाण्याची सरासरी रिकव्हरी 12.14 आहे. केंद्राने 10.25% रिकव्हरी ला 3 हजार 400 रुपये दर जाहीर केला आहे.10.25 टक्केचे चे 3 हजार 400 रुपये वरच्या 1.89 टक्केचे 642 रुपये एकूण 4 हजार 42 रुपये त्यातून तोडणी वाहतूक खर्च 887 वजा जाता 3 हजार 155 रुपये एफ आर पी होते.गेल्या हंगामात 3 हजार 100 रूपये दिले आता यावर्षी 3 हजार 150 देणार म्हणताय म्हणजे 50 रुपये वाढ आपन कारखाण्याच्या तोडणी मजुरांना 140 रुपये वाढ दिला आणि शेतकऱ्यांना 50 रुपये वाढ घ्या म्हणून सांगता.हे वागणं बरं नव्हे असा खडा सवाल आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी शिरोळ येथे केला आहे.चुडमुंगे पुढे म्हणाले गेल्या वर्षभरात साखर 400 रुपये जादा दराने गेली.मळी जवळपास 3 हजार रुपये टन जादा दराने विकला आणि शेतकऱ्यांना उसाचा दर मात्र 50 रुपये जादा देतो म्हणता.उसाचा उत्पादन खर्च मागच्या वर्षात 10% पेक्षा जास्त वाढला.शेतकऱ्यांना जगण्यासाठी लागणाऱ्या साधनाच्या किंमती 30% च्या पुढे वाढल्या आणि आपण उसाचा दर 2% वाढ देतो म्हणताय हे बरोबर नाही.दरवर्षी ऊस शेती तोट्यात करून शेतकऱ्याने काय गळफास घ्यायचा का?आपण खरंच शेतकऱ्याचे हितचिंतक असाल तर गत हंगामात तुटलेल्या उसास 3 हजार 500 द्या आणि चालू हंगामाचा 4 हजार रुपये दर जाहीर करा तर आपल्याला शेतकरी ऊस देतील आणि आपण म्हणता तितके 16 लाख टन गाळप होईल आपल्याला शेतकऱ्यांचा ऊस पाहिजे असेल तर शेतकऱ्यांना परवडणारा दर हा द्यावा लागेल हे लक्षात ठेवा.तुम्ही घोषित करायचं आणि शेतकऱ्यांनी ते निमूटपणे मान्य करायचे दिवस गेले आहेत दादा शेतकऱ्याला ऊस शेती तोट्यात करून आता बास झाले आहे.यावर्षी पण तो परवडणारा दर मिळाल्या शिवाय ऊसाला हात लावू देणार नाही असा इशारा चुडमुंगे दिला आहे.

error: Content is protected !!