शिरोळ / प्रतिनिधी
भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर ग्रामीण पूर्वचे जिल्हाध्यक्ष, आणी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य डॉ अरविंद माने, व त्यांचे सुपुत्र चि.समयनय माने यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी येथील संत रोहिदास समाज मंदिरामध्ये महिलांसाठी मोफत थायरॉईड तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.माजी नगरसेवक डॉ अरविंद माने, व समयनय माने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ, आणी माने केअर डायग्नोस्टिक प्रा.लि.यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १३ या वेळेत महिलांसाठी मोफत थायरॉईड तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराचा शिरोळ परिसरातील महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष तुकाराम पाटील (भैय्या),सचिव प्रा के एम भोसले, ट्रेझरर पत्रकार चंद्रकांत भाट, इव्हेंट चेअरमन संजय तुकाराम शिंदे यांच्यासह सर्व सदस्यांनी केले आहे.