दत्त कारखान्याने आमच्यावर अब्रू नुकसानीचे दावे दाखल करावे – आंदोलन अंकुश

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

 

शिरोळ दत्त साखर कारखान्याच्या कामकाजावर सभासदांनी मांडलेल्या विषयांचे वाचन करताना ते चुकीचे असल्याचे सांगण्यात आले, त्यानंतर सभासदांनी त्यांच्या अहवालातील आकडेवारीनुसार विषय मांडले असता त्यांनी मांडलेला अहवाल चुकीचा आहे की बरोबर हे जाहीर करावे असे खुले आव्हान आंदोलन अंकुश संघटनेचे तालुक्याध्यक्ष दिपक पाटील यांनी आज गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता शिरोळ येथे श्री दत्त कारखाना प्रशासनाला दिले आहे.शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली यावेळी जागृत सभासद दिपक पाटील यांनी वार्षिक अहवालातील अनेक मुद्यावर कारखाना प्रशासनाला धारेवर धरले.तर सभेत सभासदांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचा ठरवण्याचा प्रयत्न केला.दरम्यान आरोप चुकीचे आहेत म्हणणाऱ्या सदस्यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नांची उत्तरे देऊन आमच्यावर अब्रू नुकसानीचे दावे दाखल करावे

तसेच आजच्या सभेत दडपशाहीने विरोधकांचा  आवाज दाबण्यासाठी सभास्थळी भजन कीर्तन लावणे योग्य आहे का? असा सवाल उपस्थित करत येत्या काळात वीज प्रकल्प कारखान्याच्या नावावर व्हायला हवा,2022-23 हंगामासाठी 100 रुपये बिल मिळावे,शेवटच्या हंगामात 3 हजार 500 चे अंतिम बिल मिळाले पाहिजे,चालू हंगामात 4 हजार रुपये दर मिळावा यासाठी आमचा लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा आंदोलन अंकुश संघटनेचे दीपक पाटील यांनी शेवटी दिला आहे.

error: Content is protected !!