शिरोळ / प्रतिनिधी
मौजे आगर (ता शिरोळ) येथील जायंट्स ग्रुप ऑफ दुर्गा सहेलीच्यावतीने जायंट्स सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.जायंट्स ग्रुप ऑफ दुर्गा सहेलीच्या वतीने कुरुंदवाड येथील कन्या शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.सौ विमलादेवी खंडेराव माने माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थिनींसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेनंतर विजेत्यांना बक्षीस देण्यात आली.या स्पर्धेचे नियोजन जायंट्स ग्रुप ऑफ दुर्गा सहेलीच्या माजी अध्यक्षा सौ.कुसुम जगदाळे यांनी केले होते.कन्या माध्यमिक विद्यालय येथील परस बागेसाठी विविध भाज्यांच्या बियांचे वाटप करण्यात आले. या बियांचे संकलन ग्रुपच्या अध्यक्षा सौ अश्विनी नरुटे यांनी केले होते.विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी विद्यार्थिनींचे आत्मसंरक्षण तसेच सध्याच्या परिस्थितीत होणारे लैंगिक अत्याचार आणि त्या विरोधात कशा पद्धतीने सामोरे जायचे तसेच गुड टच बॅड टच याबद्दल जायंटस् फेडरेशन समन्वयिका डॉ सौ स्नेहल कुलकर्णी यांनी प्रात्यक्षिकासह मौलिक मार्गदर्शन केले.शालेय उपक्रमांतर्गत आनंददायी शनिवार यामध्ये ग्रुपच्या माजी अध्यक्षा सौ कुसुम जगदाळे यांनी विद्यार्थिनींना बोधपर कथा सांगून त्यांना मार्गदर्शन केले.गणेश आयु केअर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर भरविण्यात आले.यासाठी डॉ.सुधा कल्लोळी यांचे सहकार्य मिळाले. तुळस आरोग्यदायी आणि मांगल्याचे प्रतीक म्हणून तुळस आपल्या दारी या उपक्रमांतर्गत परिसरातील प्रत्येक महिलेस तुळस रोप भेट म्हणून देण्यात आले.या सर्व उपक्रमांमध्ये जायंट्स फेडरेशन समन्वयक सौ स्नेहल कुलकर्णी,जायंटस् ग्रुप ऑफ दुर्गा सहलीच्या सौ अश्विनी नरुटे,सौ कुसुम जगदाळे,सौ नलिनी देसाई,सौ सुजाता कल्लोळी,सौ.वर्षा गोखले,रेखा पाटील,सौ.पूजा बदामे यांच्यासह सर्व सदस्या उपस्थित होत्या.