घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास जेरबंद करण्यात शिरोळ पोलिसांना यश
९ लाख ६० हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत
शिरोळ / प्रतिनिधी
कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगार सुनील महादेव निकम (वय २८ वर्षे) रा गजबरवाडी ता निपाणी जिल्हा बेळगाव सध्या राहणार हरोली ता. शिरोळ जि. कोल्हापूर यास शिरोळ पोलिसांनी अटक करून त्याची कसून चौकशी केली असता त्याने या परिसरात पाच घरफोडी केल्या असल्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून ९ लाख ६० हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अशी माहिती जयसिंगपूर उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संभाजीपूर हरोली नांदणी या ठिकाणी घरफोडी होऊन रोख रक्कम व सोन्याचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्यास त्याच्या घटना घडल्या होत्या याबाबतची चोरीची नोंद शिरोळ पोलीस ठाण्यात झाली होती त्या अनुषंगाने शिरोळ पोलीस चोरीचा तपास करीत होते.इचलकरजी, जयसिंगपूर,शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढती घरफोडी रोखण्याकरीता पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील जयसिंगपूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांनी घटनास्थळी भेटी देवुन वेळोवेळी शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांना सुचना देवुन घरफोडीचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करुन घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते .वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी शिरोळ पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी, डी. बी. पथक व अमंलदार यांना सुचना देवुन घरफोडी उघड आणणेकामी माहिती काढुन संशयीत इसम यांचेवर कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.त्या अनुषंगाने शिरोळ पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी चोरी झालेल्या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही फुटेल, तसेच घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार यांचेवर पाळत ठेवुन गुन्हा उघडकीस येणेबाबत प्रयत्न करीत असताना पोलीस अमलदार युवराज खरात यांना हरोली येथे घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार रहाणेस असलेबाबत गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार त्याची संपुर्ण माहिती घेवुन सदर गुन्हेगारावर पाळत ठेवण्यात आली होती. दि. १८ सप्टेंबर २०२४ रोजी पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड व पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना हरोली गावी एक इसम संशयीत रित्या फिरत असताना त्यास हटकल्याने तो पळुन जात असताना त्यास पोलीस हवालदार बाबाचाँद पटेल, पो.कॉ युवराज खरात, संजय राठोड, नितीन साबळे यांनी शिताफीने पकडून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सुनित महादेव निकम, वय २८, रा. गजबरवाडी, ता. निपाणी, जि. बेळगाव (कर्नाटक) सध्या रा.हरोली, ता. शिरोळ, जि. कोल्हापर असल्याने सांगितले. पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दोन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचेजवळ एक सोन्याची अंगठी मिळुन आली त्याबाबत चौकशी केली असताना त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, म्हणुन अधिक चौकशी अंती त्याने काही दिवसापुर्वी हरोली येथे घरफोडी केली असलेची कबुली दिली. सदरचा आरोपी हा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असल्याने त्यास विश्वासात घेवुन अधिक माहिती घेतली असता त्याने कबुनर, इचलकरजी, हरोली, नांदणी, संभाजीपूर येथे घरफोडी केली असलेची कबुली दिली. त्याबाबत शिवाजीनगर व शिरोळ पोलीस ठाणेकडील क्राईम अभिलेख तपासले असता वरील प्रमाणे घरफोडीचे गुन्हे दाखल असलेची खात्री झाली. त्यामुळे आरोपीने दिले माहितीप्रमाणे पंचासमक्ष पंचनामा करुन चोरीस गेलेला सोने चांदीचा ऐवज तसेच आरोपी निकम याने गुन्हयात वापरलेली मोटर सायकल असा सुमारे ९ लाख ६० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपी निकम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी कर्नाटक राज्यात संकेश्वर, निप्पाणी तसेच कोल्हापूर जिल्हातील कागल, गोकुळशिरगाव, हुपरी, गडहिंग्लज, मुरगुड, आजरा, शहापूर व कुरुंदवाड इत्यादी पोलीस ठाणेत घरफोडीचे तसेच इतर चोरीचे गुन्हे दाखल आहेत.आरोपी निकम यास अटक करुन दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जयसिंगपूर यांचे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिनांक २३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली होती. त्यानंतर आज पुन्हा पोलीस कस्टडी वाढवून मिळणेकामी न्यायालयात हजर केले असता आरोपी याची दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी मंजुर केलेली आहे.