वतीने ज्ञानेश महाराव व संभाजी ब्रिगेड यांच्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या प्रकरणी कारवाई करण्यात यानी यासाठी इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.या निवेदनात हिंदुस्थान व तमाम जगतातील हिंदू साठी प्रभू श्रीराम सीतामाई व श्री स्वामी समर्थ हे देवस्थानी असून हिंदूंच्या आस्थेचा श्रध्देचा धार्मिक विषय आहे.संभाजी ब्रिगेड या संघटने मार्फत आयोजित एका कार्यक्रमात हेतू परस्पर मुद्दाम ठरवून पूर्व नियोजित पणे समाजातील वातावरण अस्थिर करण्यासाठी ज्ञानेश महाराव या व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने आपल्या भाषणातून खालच्या स्तरावर जावून प्रभू श्रीराम, सीतामाई व श्री स्वामी समर्थ या आमच्या हिंदूंच्या देव देवतांवर आक्षेपार्ह टीका टिपणी केली आहे जेणे करून हिंदूंच्या भावना दुखावल्या जाव्यात. समाजातील वातावरण अस्थिर करणे, दंगल घडवून आणणे व हिंदू धर्माच्या भावना दुखावने हा हेतू स्पष्टपणे दिसत आहे. यामुळे तमाम हिंदू जणांच्या भावना दुखावल्या असून त्याच्यावर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल करावेत. त्याचबरोबर मुंबईतील या कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या संभाजी ब्रिगेड या संघटनेवर ही गुन्हे दाखल करत कारवाई करावी व सदर संघटनेवर कायमस्वरूपी बंदी आणावी अश्या मागणीचे निवेदन आज प्रांताधिकारी सौ.मौशमी चौगुले यांना देण्यात आले.दरम्यान यावेळी प्रशासननाचे लक्ष वेधण्यासाठी कुत्र्यांनी स्वताच्या स्वार्थासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा केलेला अपमान सहन करणार नाही, भूकणाऱ्या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करा, आदी आशायांचे फलक घेऊन निषेध नोंदविन्यात आला. तसेच सेवेकऱ्यांकडून हिंदू हे नेहमीच कायदेशीर मार्गाने न्याय मागत असतात याचा आदर राखत प्रशासनाने सदर बाबींची दखल घेत कारवाई करावी अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरी व समस्त हिंदू समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.