हातकणंगले / सुकुमार अब्दागिरे
हातकणंगले रेल्वे भुयारी मार्गाजवळ असलेल्या अध्यक्ष बिअरबारवर सोमवार रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास डोक्यात वर्मी घाव घालून व पोटावर बिअरच्या काचेच्या बाटल्या भोसकून खुन करण्यात आला असून विनोद महादेव कोरवी वय ४० राहणार कोरवी गल्ली हातकणंगले असे मृत तरुणाचे नाव आहे.घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास विनोद कोरवी बार मध्ये बोलवून घेऊन त्याच्यावर हल्ला केला यामध्ये तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला.हल्ला करणारे त्याचे निकटवर्तीयच असल्याची प्राथमिक माहिती असून नेमका हा खुन कोणत्या कारणातून झाला हे समजू शकले नाही.या घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलीसांनी घटनास्थळी जाऊन तपास करत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित,अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील,पोलीस उपअधीक्षक डॉ रोहिणी सोळंके,पोलीस निरीक्षक शरद मेमाणे,सहायक पोलीस निरीक्षक सुनील माने यांचे मार्गदर्शन खाली पोलीस ठाणे कडील DB पथकाने बाबुजमाल डोंगरातुन सौरभ हनमंत कोरवी व व 20 रा कोरवी गल्ली,विनायक रामचंद्र कोरवी व व 17 कोरवी गल्ली,ऋतुराज प्रशांत पाटील व व 17 रा. शाहुनगर हातकणंगले आणि ओमकार रवींद्र नलवडे वं वं 16 बिरदेव मंदिर या चार संशयित आरोपीना ताब्यात घेतले.या कारवाईत पोलीस हवालदर समीर मुला,पोलीस अंमलदार अतुल निकम,अमित भोरे,सागर पोवार,विकी भंडारे यांचा सहभाग घेतला.