स्व.दिलीपदादा पाटील सभासद आरोग्य योजनेचा मिळणार लाभ

Spread the love

स्व.दिलीपदादा पाटील सभासद आरोग्य योजनेचा लाभ मिळणार
दिलीप दादा पाटील दिनदौलत सेवा संस्था,बाळासाहेब माने सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

शिरोळ / प्रतिनिधी

स्वर्गीय दिलीप दादा पाटील यांच्या नेतृत्व विचाराखाली सुरू असलेल्या दिलीप दादा पाटील दिनदौलत विकास सेवा सोसायटी शिरोळ यांची 53 वी तर बाळासाहेब माने विकास सेवा सोसायटी संस्थेची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. स्व. दिलीप दादा पाटील यांचे नेतृत्वाखालील संस्थांच्या सभासदांना स्व.दिलीप दादा पाटील सभासद आरोग्य योजनेचा लाभ देण्याची घोषणा युवा नेते रणजितसिंह माने पाटील यांनी केली.
दिलीप दादा पाटील दिनदौलत सेवा संस्था व बाळासाहेब माने विकास सेवा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. स्वर्गीय दिलीपराव दादा पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक दिलीप दादा पाटील सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब काळे यांनी केले. दिलीपदादा पाटील दिनदौलत सेवा संस्थेच्या 53 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अहवाल वाचन सचिव पोपट काळे यांनी केले. सभी पुढील सर्व विषयांना सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली. या संस्थेच्या सभासदांना 11 टक्के लाभांश देण्याची घोषणा सभेत करण्यात आली.
बाळासाहेब माने सेवा सोसायटीच्या 33 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अहवाल वाचन सचिव दिलीप गावडे यांनी केले. संस्थेच्या खडतर प्रवासात सभासदांनी साथ दिल्याबद्दल सभासदांचे कौतुक केले. चेअरमन सुभाष जाधव यांनी 4 टक्के लाभांश सभासदांना देण्याची घोषणा केली. सभेपुढील सर्व विषयांना सभासदांनी टाळ्यांच्या गजरामध्ये मंजुरी दिली.यावेळी बोलताना युवा नेते रणजितसिंह माने पाटील म्हणाले, स्व.दिलीप दादा पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या सभासदांनी दिलीप दादा पाटील दिनदौलत सेवा सोसायटी आणि बाळासाहेब माने सेवा सोसायटीच्या भरभराटीसाठी महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. सभासद हेच या संस्थांचे खरे मालक आहेत आणि विश्वस्त म्हणून आमच्यावर टाकलेला विश्वास आणि दिलेली साथ खूप मोलाचे आहे. यापुढील कालावधीमध्ये ही असेच सहकार्य व भक्कम साथ मिळावी. संस्था आणखी प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी पीक कर्ज मर्यादा वाढवणे, देवस्थान जमीन असणाऱ्या सभासदांना कर्ज पुरवठा करणे, संमतीक्षेत्र सभासदांना कर्ज पुरवठा लाभ देण्याबाबतचा ठराव त्यांनी मांडला.याप्रसंगी एन.वाय.जाधव, रामदास गावडे, विजयसिंह माने देशमुख, शिवाजीराव जाधव सांगले,गजानन चव्हाण, बजरंग काळे गुरुजी, बाबुराव देशमुख, मानसिंग पाटील, डी.आर.माने, सुनील पाटील, फत्तेसिंह मोरे, सुभाष चव्हाण, शिवाजी पांडू माने यांच्यासह दोन्ही संस्थांचे संचालक, कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार प्रकाश पाटील यांनी मानले.

error: Content is protected !!