मंदिराचे कुलुपे तोडून देवीच्या अंगावरील सोन्या-चांदीची दागिन्यावर डल्ला

Spread the love

धरणगुत्ती महालक्ष्मी मंदिरात देवीच्या दागिन्यांची चोरी

शिरोळ / प्रतिनिधी

धरणगुत्ती (ता.शिरोळ) येथील श्री महालक्ष्मी मंदिराचे कुलुपे तोडून देवीच्या अंगावरील सोन्या-चांदीची दागिने व सीसीटीव्ही सेट असा एकूण 65 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. याबाबती नोंद शिरोळ पोलिसांत झाली आहे.पोलिसांना मिळालेली माहिती अशी, धरणगुत्ती येथे असलेल्या महालक्ष्मी मंदिरात चोरट्यांनी 3 कुलुपे फोडून मंदिरात प्रवेश केला व देवीच्या अंगावरील चांदीचे कान, सोन्याची नथ, चांदीचे हात, चांदीचे पायातील तोडे व सीसीटीव्हीचा संच असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. पहाटे 5.30 च्या सुमारास पुजारी विनोद गुरव हे मंदिरात पूजेसाठी आल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची फिर्याद विनोद सुधारकर गुरव (रा.नांदणी) यांनी दिली आहे. घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ.रोहिणी सोळंके व पोलिस निरिक्षक शिवाजी गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली.

error: Content is protected !!