निराधार लाभार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा

Spread the love

हातकणंगले संजय गांधी निराधार योजना कार्यालयामार्फत संजय गांधी,श्रावणबाळ,इंदिरा गांधी आदी विविध योजनांचे कामकाज हातकणंगले तहसिल कार्यालयातून चालते. परंतु, या कार्यालयामार्फत अनुदान वितरण कामातील भोंगळ कारभारामुळे अनुदान मंजूर होऊनही लाभार्थ्यांना त्यापासून वंचित रहावे लागत आहे.त्यामुळे निराधार लाभार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा

काढण्यात आला.यामध्ये इंदिरा गांधी वृध्दापकाळ आणि विधवा या दोन्ही योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून वित्तरीत होणाऱ्या फेब्रुवारी २०२३ पासूनच्या अनुदानाच्या फरकाची रक्कम तातडीने मिळावी.तसेच दरमहा नियमित अनुदान खात्यावर जमा करणेत यावे.२१ हजार रुपयांचा असलेल्या उत्पन्न दाखल्याची मर्यादा रु. १ लाखापर्यंत करणेत यावी.तसेच संजय गांधी, इंदिरा गांधी व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांना दरमहा 4 हजार रुपये अनुदान मिळावे. याचबरोबर सर्वच लाभार्थ्यांना दरमहा नियमितपणे अनुदान मिळावे.रेशनकार्डमधील नांव कमी करणे व नवीन नांव वाढविणे यासाठी हुपरी,रेंदाळ,साजणी या गावांमध्ये दोन दिवस कॅम्पचे आयोजन करणेत यावे.व संजय गांधी योजण लाभार्थ्यांना दरमहा मोफत रेशनधान्य मिळावे.आदी मागण्यांचे निवेदन आज प्रांताधिकारी कार्यालयात मोर्चा काढून देण्यात आले.दरम्यान,यावेळी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन निषेध व्यक्त केला.तसेच मागण्यांची निर्गत न झाल्यास आम्हांस नाईलाजस्तव तीव्र आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी दिनकर कांबळे, विशाल साजणीकर, प्रकाश मोरबाळे, वसंत तांबे, दगडू कांबळे, बाळासाहेब चौगुले, तोसीफ जमादार, रंजना माळी आदींसह अन्य लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!