“धक्कादायक घटना” गेटचा करंट बसुन महीलेचा जागीचं मृत्यु

Spread the love
घरातील गेट चा करंट बसुन रुकडी येथील महीलेचा जागीचं मृत्यु
रुकडी / प्रतिनीधी 
घरातील गेटचा करंट लागुन रुकडी येथील त्रीशला गीरीष कोळी वय ३६ या महीलेचा जागीच मृत्यु झाला असल्याची दुर्दैवी घटना सोमवार दुपारच्या सुमारास घडली आहे.नेमका करंट कशामुळे बसला हे समजलेच नसल्याने परीसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी  रुकडी ता.हातकणंगले येथील त्रीशला कोळी या आपल्या ९ वर्षाच्या मुलीस दवाखाण्यात उपचारासाठी दाखल केल्यामुळे घरातील काम आवरुन जाण्याची तयारी करत होत्या.काम आवरुन दुसऱ्या मजल्यावर गेट उघडून जात असताना अचानक गेट मध्ये उतरलेल्या वीजेच्या प्रवाहामुळे त्या गेटला चीकटल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला त्यांच्या पश्चात ९ वर्षांची मुलगी,पती,आई,वडील, भाऊ असा परीवार आहे.घटनास्थळी महावितरणच्या जिल्हा विद्युत निरीक्षक मीरा पाटील यांनी सहकाऱ्यांसह भेट देत पाहणी केल्या असता कोळी यांच्यासह शेजारील मंगल आण्णासो कांबळे यांच्या घरातील गेटलाही करंट असल्याचे निदर्शनास आले.गेट मध्ये नेमका करंट कशामुळे उतरला हे शोधण्याचे काम सायंकाळी उशीरा पर्यंत महावितरणचे कर्मचारी करत होते.घटनेची माहीती सामाजीक कार्यकर्ते अनील बागडी- पाटील यांनी हातकणंगले पोलीसांना दिली असता घटनेची नोंद घेत अधीकाऱ्यांनी तात्काळ घटना स्थळी भेट दिली.

अधिक तपास सुरजानंद चव्हाण हे करत आहेत.घटना स्थळी पोलीस पाटील कवीता कांबळे यांनी भेट दिली.

error: Content is protected !!