पालकमंत्री मुश्रीफ यांच्या घरासमोर बेमुदत उपोषण करणार

Spread the love
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी 2 ऑक्टोबर ला पालकमंत्री मुश्रीफ यांच्या घरासमोर बेमुदत उपोषण
आंदोलन अंकुशचे पालकमंत्री व  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
ऊस हंगाम 2022/23 मधील ठरलेला दुसरा हप्ता 100 रुपये तातडीने द्यावा अन्यथा 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपासून कागल येथील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत उपोषणास बसू असा इशारा निवेदन पालकमंत्री हसनसो मुश्रीफ व कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना आंदोलन अंकुशच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.निवेदनात म्हटले आहे की मागील हंगामाच्या तोंडावर झालेल्या आंदोलनात आपण मध्यस्ती करून ज्या कारखान्यांनी 3 हजारच्या वर दिला आहे.त्यांनी 50 रुपये व 3 हजारच्या आत दर दिला त्यांनी 100 रुपये दुसरा हप्ता देण्याचे कबूल केले होते.दोन महिन्यात शासनाची परवानगी घेऊन हा दुसरा हप्ता देणार म्हणून जिल्हाधिकारी यांच्यासह कारखान्यांनी शेतकऱ्यांना लेखी शब्द दिलेला असताना एकाही कारखाण्याने अद्याप पैसे दिलेले नाहीत.कोल्हापूर जिल्ह्यातील 7 कारखान्यांनी शासनाकडे परवानगी मागितली आहे.त्यालाही सरकारने सहा महिने प्रस्ताव आले.तरी परवानगी दिली नसल्याने शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत.15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर याच मागणीसाठी आंदोलन अंकुश संघटनेने उपोषण केले होते. त्यावेळी पालकमंत्री यांनी बैठक घेऊन 15 दिवसात प्रस्तावाना मंत्री महोदय यांच्याकडून मान्यता घेऊन देतो असे सांगितले होते.
याला आता 1 महिना होऊन गेला तरी आपणाकडून परवानगी घेऊन देता आली नाही.
महापूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे.अशा वेळी त्याला मदतीची गरज असताना शासन त्यामध्ये अडकाठी आणत आहे.किमान 7 कारखाने पैसे देण्यास तयार असताना शासन त्यांना परवानगी का देत नाही हा प्रश्न पडला आहे.आणि शासन शेतकऱ्यांना साथ देत नाही याचे दुःख असून येत्या 2 ऑक्टोबर म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती पूर्वी शासनाने कारखान्यांच्या प्रस्तावाना मान्यता दिली नाही तर आम्ही आपल्या कागल निवास्थानी बेमुदत उपोषणास बसण्याचा निर्णय घेणार आहोत.निवेदनावर धनाजी चुडमुंगे यांच्यासह दिपक पाटील, संभाजी शिंदे,महेश जाधव,संभाजी माने,अशाराणी पाटील यांच्या सह्या आहेत.
error: Content is protected !!